खांब देवकान्हे मार्गावर जिवघेणे वळणे काटेरी झुडपे वाढल्याने धोकादायक,जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास,

कोलाड  (श्याम लोखंडे ) :  मुंबई गोवा महामार्गालगत जोड़ला गेलेला उप रस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड तसेच हा मार्ग अनेक गावांना जोड़ला गेला असून या मार्गावरुन सातत्याने वहानांची वर्दल तसेच रहदारिचा मार्ग म्हणून सर्वांनाच सुप्रसिद्धआहे या मार्गावर अनेक  मोठ मोठे जिव घेणे वळणे व  काटेरी झुडपे खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असून मार्ग झालाय धोकादायक  जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास तसेच खांब धानकान्हे देवकान्हे मार्गावर खड्डे पडल्याने रहदारी करत असलेल्या वहान चालकांना वाढलेल्या झुडपांमुळे काहीसा अंदाज या पडलेल्या खड्यांचा तसेच वळणांचा येत नसल्याने या ठिकाणी अनेक छोटे मोठे आपघात घडत असून या मार्गावर श्री तीर्थक्षेत्र तळवली चिल्हे धानकान्हे देवकान्हे नजिक भयानक पडलेल्या खड्यांमुळे तसेच काटेरी झुडपांमुळे रहदारी करणार्‍या नागरिकांना येत नसल्याने धोकादायक ठरत आहे .

तसेच कुंडलीकेचा उजवा तीर समजल्या जाणाऱ्या कालव्यातुन भात शेती साठी येणाऱ्या पाण्याच्या नाल्यावरील साकावं ही अत्यंत जीर्ण झाली असून ती केव्हा ही कोसलू शकतात अशी गंभीर अवस्था या मार्गाची निर्माण झाली असून ती केव्हा ही कोसळू शकतात व मोठा आपघाताचा धोका होण्याची दाट शक्यता संभावत आहे या मार्गावरील खांब ते चिल्हे या रस्त्याचे डांबरीकरण व रुन्दीकरण  काही लाखो रूपये खर्च करून गत वर्षी नव्याने केले होते परंतु याही मार्गवर खांब नडवली दरम्यान तसेच श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या ठिकाणी भलेमोठे जीव घेणे खड्डे पडल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांचा एकच संताप होत असून मोठा आपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर धानकान्हे देवकान्हे हा मार्ग तर  जणू मृतुचा साफलाच बनला असून नडवळी चिल्हे देवकान्हे या ठिकाणच्या नाल्यांवरील जीर्ण अवस्थेत असलेले साकव व रस्ता याकडे आजतागत कोणी ठुंकुन सुधा पाहिले नाही या मार्गाचे नव्याने काम तर सोडाच परंतु सबंधित प्रशासकीय खात्यामार्फ़त याची साधी डागडुजी देखील गेली सात ते आठ वर्षात केली नसल्याचे समोर येत आहे तसेच या मार्गवर गेल्या वर्षभरात अनेक छोटे मोठे आपघात झाले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत सदर मार्गाच्या कडेला वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामांच्या नावाखाली स्थानिक पुढाऱ्यांची फक्त बोंबा बोंब खांब विभागातील हाती घेतले कोणते हि काम आजतागत पूर्ण तत्वावर नाहीत तर विकासाचा बोजवारा कायम स्वातंत्र्य काळात देखील देखील त्याचा फटका सर्व सामान्य माणसाला सोसावे लागत असून जय नागोबा पोहा मिल तळवली तर्फे अष्टमी ते धानकान्हे देवकान्हे या मार्गावर अक्षरशः मोठं मोठी काटेरी झुडपे वाढल्याने समोरील ये जा करणारी वहाणे वाहन चालकाला दिसतच नसल्याने मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे परिसरातील नागरिकांचा एकच संताप व्यक्त केला जात आहे.

मुबंई गोवा महामार्गावला जोडला गेलेला उप रस्ता म्हणजे खांब ते पालदाड या मार्गावर अनेक गावे वसलेली आहेत खांब देवकान्हे मार्गे धाटाव रोहा या ठिकाणी येथील ग्रामस्थ नागरिकांचा तसेच शालेतील विद्यार्थ्यांचा या मार्गावरून सुखकर प्रवास व रहदारी व्हावी यासाठी या मार्गावर स्थानिक पातळीवर अनेक उपाय योजना राबविण्यात येतात मात्र त्या किती आमलात व किती अर्धवट याचा काही गणित नाही तर संबधित खात्याकडून सतत डोळे झाक होत असल्याचे बोलले जात आहे,

सामाजिक कार्यकर्त्या गुलाबताई वाघमारे व संबंधित नागरिकांकडून प्रशासकीय खात्यामार्फत उपाय योजना कराव्यात मागणी,

रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील ग्रामीण भागात राज्यसरकार व केंद्रसरकारच्या विविध योजना सतत फ़ोल ठरत आहेत खांब चिल्हे रस्ता रुन्दी करण व डांबरी करनावर लाखो रूपये खर्च केले परंतु ठेकेदारानी निकृष्ठ दर्जाचा काम केल्याने या मार्गवर असलेले जिव घेणे वळणे तसेच आधीपासूनच पडलेले खड्डे  त्यात नव्याने मोठं मोठी वाढलेली काटेरी झुडपे त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत असून  आपघातांची मालिका सुरुच आहे तर धानकान्हे देवकान्हे मार्गाची देखील अक्षरशा चालन झाली असून या मार्गावरील व नाल्यांवरील साकव जीर्ण झाली असून ती केव्हाही कोसलन्याची भिती झाली आहे तसेच या मर्गावरून प्रवास करतांना जिव मुठित धरून प्रवास करवा लागत आहे,तरी संबधित प्रशासकीय अधिकारी वर्गाने या मार्गावरील खड्डे दुरुस्थिसाठी व वाढलेली काटेरी झुडपे तसेच काही धोकादायक वळणांवर व नाल्यांवरील जीर्ण झालेले साकव या ठिकाणी सूचना फलक संबधित ग्राम पंचयात मार्फ़त काही उपाय योजना करण्यात यावे अशी मागणी आदर्श सामाजिक विकास सेवा संस्थेच्या कार्यध्यक्षा तसेच आदिवासी महिला कार्यकर्त्या गुलाब वाघमारे यांनी तसेच सर्व संबधित नागरिक वर्गाकड़ून केली जात आहे.