कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील इंग्रजी शिक्षणात अग्रेसर असलेल्या एम. एन. लोखंडे अँड वेलफेअर सोसायटी खांबचे ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांबने विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत यांच्या वतीने येथील विद्यार्थ्यांसाठी स्काउड गाईड शिबीर २८ डिसेंबर २०२२ ते २९ डिसेंबर २०२२ गेली दोन दिवस मोठया उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आले असून बुधवार दि.२८ डिसेंबर २०२२ रोजी स्काउड गाईड शिबिरा प्रसंगी सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. यानंतर संचलन, टेंट सजावट निरीक्षण, स्काउड गाईडचा इतिहास,भोजन,तद्नंतर विविध खेळ, बँडेज प्रकार प्रथोमोचार,कोलाज स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याला येथील विद्यार्थी वर्गाने भरभरून प्रतिसाद देत काही क्षण आनंद लुटला .
त्याच बरोबर दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.२९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ध्वजरोहन, संचलन टेंट सजावट निरीक्षण, गाठीचे प्रकार, यात विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून खाऊचे व दुकानाचे स्टॉल लावले होते ,भोजन, गावची जत्रा,विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेकोटी कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दोन दिवस मोठ्या उत्साही वातावरणात रंगलेला हा स्काऊट गाईट कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.आनंददायी आणि मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.