खासदारांच्या वेतनातून ३० % कपात; राज्यसभेत विधेयकाला मंजूरी

नवी दिल्ली :  देशाची कोरोना व्हायरस महामारी मुळे झालेली परिस्थिती लक्षात घेता, खासदारांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 वर्ष खासदारांच्या पगारात 30 टक्के वेतन कपातीचे विधेयक आज राज्यसभेत मंजूर झाले. राज्यसभेने खासदार सदस्य वेतन, भत्ता आणि पेंशन (दुरुस्ती) विधेयक, 2020 ला मंजूरी दिली. लोकसभेत हे विधेयक आधीच मंजूर झाले होते.

प्रल्हाद जोशी संसदीय कार्यमंत्री यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केले होते. गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी देखील विधेयक सादर केले होते. दोन्ही विधेयक सोबत ठेवत आवाजी मतदानांद्वारे विधेयकाला मंजूरी देण्यात आली. या निधीचा उपयोग कोव्हिड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीशी लढण्यासाठी केला जाणार आहे.