खा. सुनील तटकरेंच्या हस्ते वडखळ ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन

sunil-tatakare.2
पेण (राजेश प्रधान) : पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीच्या वतीने नवेगांव येथे भूमिगत गटारे, पेव्हर ब्लॉक रस्ते भूमिपूजन, वडखळ मुख्य रस्त्यावरील कमानी, इन्द्रनगर रस्ता डाबरीकरण, इंद्रानगर येथे पाण्याची टाकी बांधणे, श्री. शिवशभो मालवाहतुक संघटाना वडखळ वावे कार्यालयाचे उदघाटन आदि विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकुर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, वडखळ सरपंच राजेश मोकल,माजी सरपंच पुजा मोकल, शरद पाटील, जितेंद्र ठाकुर, माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे, युवक अध्यक्ष विकास पाटील, जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष यशवंत घासे, गंगाधर पाटील, परशुराम मोकल, बंड्याशेठ पाटील आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, पेण तालुक्यातील वडखळ हा मोठा विभाग आहे. सरपंच राजेश मोकल यांच्या कारकिर्दीत अनेक विकास कामे होत असताना आणि येथील होणार विकास पाहता आपणांस समाधान वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी माझं पेणच्या वतीने रेल्वे संदर्भातील मागण्या बाबतचे निवेदन खा.तटकरे यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *