माथेरान (मुकुंद रांजाणे) : महाड तालुक्यातील खुटील गावी प्राथमिक उपचार केंद्र तपासणी शिबीर आणि मार्गदर्शन उपक्रम २७ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय खुटील येथे संपन्न झाले,
यामध्ये पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेतला होता.महाड तालुक्यातील खुटील या ग्रामीण भागात प्राथमिक उपचार केंद्र नसल्यामुळे उपचाराकरिता ७ ते ८ किलोमिटर अंतरावर खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारकरिता कमीत कमी प्रवासासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत व खाजगी डॉक्टराचा खर्च २०० सर्व मिळून ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत असल्यामुळे साधारण शेतकरी बांधवांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचण निर्माण होत असून आजारपण वाढत जातो व मग मुंबई पुणे शहरामध्ये उपचारासाठी जावे लागते तेव्हा हीच सेवा आपण आपल्या गावत राबवत आहोत असे ओम गणेश सेवा मंडळ ग्रामस्थ पुणे मुंबई यांच्या संकल्पनेतून करण्यात आली, आरोग्य सेवा हा आमचा मानवी हक्क आहे आणि आरोग्यसेवा ना सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे या हेतूने वरील उपक्रमास सुरवात करण्यात आली.
या दरम्यान आरोग्य केंद्र चिंभावे वैदकीय अधिकारी डॉ. पदमिनी बेरलीकर, आरोग्य निरीक्षक डी.के.हाटे, आरोग्य परिक्षिका श्रीमती आर.आर.जाधव, आरोग्यसेवक गणेश गोसावी, प्रयोग शाळा तंत्रज्ञान रेखा पारधी यांनी आरोग्य शिबिरात मार्गदर्शन केले.खुटील ग्रामपंचायत सरपंच राजेश सुकुम, ग्रामसेवक परमेश्वर तिकडे, सदस्य नंदकुमार धाडवे, सदस्या नयना अजित धाडवे , अंगणवाडी शिक्षिका माधवी धाडवे,श्री जननी सोमजाई ग्रामविकास मंडळ (रजि) खुटिल अध्यक्ष जगन्नाथ कांदळेकर, एकनाथ सुकूम, ओम गणेश सेवा मंडळ ग्रामस्थ अध्यक्ष किसन आंबेकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष कैलास धाडवे, खजिनदार नितिन निंबरे, सल्लागार काशिनाथ आंबेकर, जयदास मोरे, सदस्य प्रवीण मोरे अंगणवाडी सेविका, पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते.
यादरम्यान पंचक्रोशीतील नागरिकांचे आरोग्य प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना मोफत औषधे देण्यात आली,यावेळी ओम गणेश सेवा मंडळ व ग्रामपंचायत सरपंच यांच्या प्रयत्नातून आठवड्यातून एकदा मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे देण्यात येणार असल्याचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष कैलास धाडवे व आरोग्य निरीक्षक डी.के.हाटे तसेच सरपंच राजेश सुकूम यांनी सांगितले.
Related