मुंबई : मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले (राणीची बाग) उद्यान, हे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 15 फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा सुरू होणार आहे.
लॉकडाऊनमुळे बंद असलेलं प्राणीसंग्रहालय आता तब्बल 11 महिन्यांनी उघडणार आहे. पण प्राणीसंग्रहालय नागरिकांसाठी उघडण्यात आले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 200 हून अधिक विदेशी पक्ष्यांना बंदिस्तच ठेवलं जाणार आहे. त्यांना मोकळं सोडण्यात येणार नाही. तर वाघ, पेंग्विन आणि बिबट्यांसारख्या इतर प्राण्यांना मोकळं सोडलं जाईल.
भायखळा प्राणीसंग्रहालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राणीसंग्रहालय हे पुन्हा प्रत्येक स्पॉट्सवर योग्य सामाजिक अंतर राखून आणि सॅनिटायझर चा वापर करूनच उघडण्यात येईल. कोविड 19 च्या सर्व सूचनांची विशेष काळजी घेण्यात येईल. तसेच आम्ही प्राणीसंग्रहालयात गर्दीचे नियोजन करू आणि गर्दी वाढताना दिसली, तर प्राणिसंग्रहालयात प्रवेश काही काळ थांबवला जाईल.”