खेळामुळे एकोपा निर्माण होतो : माजी सभापती सदानंद गायकर

mahesh35

नागोठणे (महेश पवार) : ग्रामीण भागातील मुलांना आपल्या खेळातील गुण व प्राविण्य दाखविण्याची संधी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने दिली असून या संधीचा खेळाडूंनी फायदा करून घ्यावा असे आवाहन करून १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी असे तीन दिवस चालणार असलेल्या या क्रिकेट सामान्यांना कुठलाही गालबोट लागू न देण्याची काळजी आयोजकांनी घ्यावी अशी सूचना यावेळी रोहा पं. स. चे माजी सभापती राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय नेते सदानंद गायकर यांनी केली. खेळामुळे शरीर व बुद्धीला चालना मिळते. खेळा मध्ये जातीय भेदभाव नसतो. खेळामुळे एकोपा निर्माण होतो असे मार्गदर्शनपर विचार सदानंद गायकर यांनी मांडले.

ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित जीपीएल (ग्रामीण प्रीमियम लीग २०२१) क्रिकेट सामाने पाटणसई -वाकण येथील कै. देविदास गायकर क्रिडांगणावर संपन्न होत असून या सामन्यांचे उदघाट्न सदानंद गायकर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी गायकर उपस्थित खेळाडू व क्रिडाप्रेमींना मार्गदर्शन करताना बोलत होते. दरम्यान जाखमाता संघ वेलशेत विरुद्ध बाहेरशिव संघ यांच्यात झालेल्या उदघाट्निय सामन्यात बाहेरशिव संघाने विजय मिळविला. या सामान्यामध्ये बाहेरशिव संघाने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली व ५ षटकांच्या सामान्यांमध्ये वेलशेत संघास ६३ धावांमध्ये रोखून बाहेरशिव संघाने सहज विजय मिळविला. या सामान्यांमध्ये समालोचक म्हणून प्रसिद्ध समालोकाच योगेश जाधव व अतिश सारले काम पाहणार आहेत.

यावेळी नागोठणे पो. नि. दादासाहेब घुटुकडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकर ठमके, पाटणसई माजी उपसरपंच पांडुरंग गायकर, वांगणी माजी सरपंच एकनाथ ठाकुर, प्रियदर्शनी संस्थेचे संचालक शेखर ठाकूर, हभप दळवी गुरुजी, पाटणसई ग्रा. स. सुरेश गायकर, मनसे युवा नेते हरिश्चंद्र तेलंगे, वांगणी ग्रा. स. प्रमोद जांबेकर, विनायक तेलंगे, हेमंत गायकर, बाळासाहेब वाजे, पळस ग्रा. स. किसन बोरकर, सुभाष मढवी, बाळशेठ मढवी, प्रह्लाद राणे, पाटणसई तंटामुक्त अध्यक्ष मधुकर गायकर, गंगाराम गायकर, भागवत जांबेकर, अशोक कोतवाल, काशीराम कोतवाल, तुकाराम कदम, महेंद्र कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

जीपीएल क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक गायकर, मनोज वाजे, आकेश हारपाल, राकेश खांडेकर, कमलाकर तेलंगे, पंकज कोकाटे, उचेश कमतगी, अलंकार म्हात्रे, संदेश कासार, विश्वास गायकर, शरद भोईर आदी विशेष मेहनत घेत आहेत.