कर्जत (गणेश पवार) : खोपोलीच्या कु.समृद्धी कांबळे हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षा खालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआय आयोजित मुलींच्या पंधरा वर्षा खालील क्रिकेट स्पर्धेसाठी आज महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात आला त्यात समृद्धीची निवड अंतिम 15 च्या पथका मध्ये करण्यात आली आहे.
महाराष्ट्र, बडोदा, हरियाणा, पाँडिचेरी, छत्तीसगड, आणि मुंबई ह्या संघांबरोबर महाराष्ट्रा मुकाबला होणार आहे, 26 डिसेंबर पासून स्पर्धेला सुरुवात होत आहे, महाराष्ट्राचा पहिला सामना रांचीच्या ओवल मैदानावर मुंबई संघा विरुद्ध होणार आहे.
समृद्धी कांबळे हि क्लिक-फ्लिक क्रिकेट क्लब खोपोलीची खेळाडू असून तिला रोहित कार्ले प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शनाखाली करत आहेत. समृद्धीची महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल रायगड प्रीमियर लिग सह जिल्ह्यातील विविध भागातून क्रिकेट प्रेमी अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.