गडब खारमाचेला नैसर्गिक नाल्याचे पाईप काढून मार्ग सुरळित करा अन्यथा सामूहिक आत्मदहन – बापदेव शेतकरी मंडळाचा ईशारा

gadab
पेण (राजेश प्रधान) : JSW कंपनीने गडप खार माचेला येथील नैसर्गिक नाले बुजवून पाईप टाकल्याने येथील शेतकऱ्यांचा व मच्छीमारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाईप काढून नैसर्गिक नाला पुरवत करा अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा ईशारा बापदेव शेतकरी मंडळाने दिला आहे.
पेण तालुक्यातील गडब गावातील खाडीकिनारी असलेल्या खारमाचेला सर्व्हे क्र. 94 येथे गावाकडून धरमतर खाडीच्या दिशेने जाणारा नैसर्गिक नाला पूर्वापार आहे. मात्र हा नाल्याचा मार्ग जेएसडब्ल्यु कंपनीने भराव करून बांध घालुन चार सिंमेंन्टचे पाईप टाकून बंद केला आहे.
गडब येथील मच्छीमार मच्छिमारीसाठी खाडीकडे येण्या जाण्यासाठी नाल्याच्या पाण्यातून होडी घेवून मच्छिमारीचा व्यवसाय करीत असत. मात्र आता मार्गच बंद झाल्याने मच्छिमारी व्यवसाय ही बंद झाला आहे. परिणामी गेली 10-12 वर्षापासून मच्छिमारी बंद झाल्याने शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत खारबंदिस्ती विभाग व संबंधित प्रशासन दखल घेत नाही म्हणून बापदेव शेतकरी मंडळाचे २० ते २५ शेतकरी २६ डिसेंबर रोजी पेण उपविभागिय कार्यालयात सामुहिक आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिला आहे.
याबाबत बापदेव शेतकरी मंडळातर्फे अध्यक्ष सुनिल कोठेकर, सुभाष कोठेकर, काशिनाथ कोठेकर, दिलीप कोठेकर, लहू कोठेकर, प्रविण म्हात्रे, महेंद्र कोठेकर, सचिन कोठेकर, इत्यादी शेतक-यांनी पत्रकार परिषदेत आत्मदहन करणार आसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले  आहे. या बाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता खण्मी पर्देशन मुख्यमंत्री,कार्यकारी अभियंता खारभुमी विभाग, जिल्हाधिकारी, उपविभागिय अधिकारी  पेण यांना दिले आहे.
nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *