गणपती बाप्पा मोरया! श्री गणराय आले घरी

पेण : श्री गणरायांचे आज घरोघरी आगमन झाले आहे. अतिशय उत्कटतेने ज्या उत्सावाची कोकणवायीय वाट पहात असतात, तो गणेशोत्सव आजपासून सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.

यावर्षी गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसच्या संकटाचे सावट असल्याने नेहमीपेक्षा हा उत्सव थोडा वेगळा ठरणार आहे. प्रशासनाने कोरोनाचा विचार करून अनेक निर्बंध लादले आहेत, या निर्बंधाच पालन करत गणेशभक्तांना गणेशोत्सव साजरा करायचा आहे.