पनवेल (संजय कदम) : काम करत असलेल्या दूध डेअरीच्या गल्ल्यातून सुमारे अडीच लाख रुपये रोख रक्कम चोरून गावी पळून गेलेल्या आरोपीला एन आर आय पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीकडून स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात आलेले ९५ हजार रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर घटनेतील आरोपी शिवम राजेश शुक्ला (वय 23, रा जोनपूर, उत्तर प्रदेश) ह्याने काम करीत असलेल्या दूध डेअरीच्या गल्ल्यातील सुमारे अडीच लाख रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. त्याअनुषंगाने पोलिसांचे उत्तर प्रदेश येथे एक पथक रवाना झाले परंतु पथक उत्तर प्रदेश जोनपुर येथे पोहोचले असता आरोपी परत नालासोपारा ठाणे येथे आल्याचे समजले.
आरोपी हा वारंवार सिम कार्ड बदलून आपले राहण्याचे ठिकाणे बदलवत असल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण होत होता. अखेर तांत्रिक तपासद्वारे तो वज्रेश्वरी येथील एका डोंगराळ भागात लपून बसल्याचे समजताच त्याला तेथून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करून चोरी केलेली रकमेतील सोळा हजार रूपये किमतीचा विकत घेतलेला फोन व आरोपीचे स्वतःचे अकाउंट वर डिपॉजिट केलीली ९५ हजार रुपये रक्कम गोठविण्यात यश आले आहे.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून या अगोदरही बऱ्याच ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक केकान, पोलीस उपनिरीक्षक तांबे, पोलीस उपनिरीक्षक शेलार, पोलीस हवालदार जगदीश पाटील, पोलीस हवालदार विजय देवरे ,पोलीस हवालदार रोहन तांडेल ,पोलीस नाईक किशोर फंड, पोलीस नाईक दामोदर वाघमारे, महिला पोलीस शिपाई पूनम जाधव आदींच्या पथकाने हि कामगिरी पार पाडली.