पनवेल (संजय कदम) : गांजा या अंमली पदार्थाचे उघड्यावर सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील वावंजे येथील रिकाम्या मैदानात आरोपी मोहम्मद रशीद इस्माईल खान (वय ३६) हा व तालुक्यातील पाली येथील मोकळ्या मैदानात ज्ञानू रायसाहब सिंग (वय ३५) हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी गांजा हा अंमली पदार्थ सिगरेटच्या तंबाखूमध्ये मिसळून सेवन करीत असल्याचे आढळून आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय गळवे व त्यांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सरकारतर्फे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.