कर्जत (गणेश पवार) : नेरळ ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पाची जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आणि प्रकल्प राबविण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत मधील जेष्ठ नागरिक आणि विविध थरातील व्यक्तींकडून सल्ले मागण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, नेरळ गाव आणि ग्रामपंचायत स्वच्छ,सुंदर आणि स्वस्थ करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार असून सर्वांचा सहभाग घेतला जाणार आहे.
नेरळ ग्रामपंचायत साठी रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ ममदापुर विकास प्राधिकरण कडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प लाह ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून राबविला जात असून नेरळ ग्रामपंचायतचा हा प्रकल्प नेरळ गाव आणि ग्रामपंचायत स्वच्छ,सुंदर,स्वस्थ करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण पासून कचऱ्याचे विघटन या सर्व बाबत जनजागृती करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत कार्यलयात नेरळ गावातील विविध थरातील समाजातील व्यक्तींचे सल्ले ऐकून घेण्यासाठी बैठका आयोजित केल्या होत्या.त्यावेळी स्थानिक पत्रकार त्यानंतर नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच अन्य शाळा यांच्यासह नेरळ मधील डॉक्टर यांच्या बैठक आयोजित केल्या होत्या. या सर्व बैठकांना नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी,उपसरपंच मंगेश म्हसकर,ग्रामपंचायत सदस्य धर्मानंद गायकवाड,संतोष शिंगाडे,गीतांजली देशमुख,शिवाली पोतदार,श्रद्धा कराळे,उमा खडे,माजी सदस्य केतन पोतदार आदींसह लाह ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे समन्वयक उपस्थित होते.
नेरळ ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन,जैवविघटनशील घटक, पुनर्वापर योग्य कि अयोग्य याबाबत जनजागृती करण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतने हाती घेतले आहे.त्याचवेळी ओला कचरा,सुका कचरा,घरगुती धोकादायक कचरा आणि ई कचरा याबद्दल मार्गदर्शन बैठकांमध्ये करण्यात आले.या प्रकल्पाच्या जनजगृती मध्ये महत्वाची भूमिका असलेल्या आयोग्य विभागातील खासगी सेवा बजावणारे डॉक्टर यांनी सहभाग घेतला. त्यात डॉक्टर श्रीकांत डहाके,डॉ शेवाळे,डॉ साळुंखे,डॉ राठोड,डॉ सरोदे,डॉ कर्वे,डॉ चौधरी,डॉ खान आदींनी सहभागी होत चर्चा केली.त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत कडून सर्व दवाखाने यांच्यामधून निघणारे मेडिकल वेस्ट हे त्यांनी कोणत्याही कचरा कुंडीत अथवा घंटागाडी मध्ये टाकायचे नाही अशी सूचना केली.
त्याचवेळी हे मेडिकल वेस्ट त्यांना शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे दिले जावे अशी मागणी ग्रामपंचायतने केली. तर नेरळ ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शाळा त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला नेरळ मधील विद्या विकास शाळेच्या मुख्याध्यापिका निकम,एलएईएस शाळेचे प्रतिनिधी तसेच नेरळ मधील कन्या शाळेचे मुख्याध्यापक थोरवे,आनंदवाडी शाळेचे मुख्यध्यापक राठोड,जुम्मापट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पाटील यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होता. तर पत्रकारांच्या सभेत लाह ग्रीन इंडिया कंपनीच्या कार्यकर्त्यांचा निषेध करण्यात आला.त्यांनी आधी शेजारचे कर्जत आणि माथेरान येथील शून्य कचरा डेपो पाहून यावे अशी सूचना केली.