कोलाड (श्याम लोखंडे ) : दीड दोन महिन्यांपूर्वी प्रचंड मोठया प्रमाणात पडलेल्या पावसामुळे मडगाव ते गोवा दरम्यान पेडणे भोगदयावर मोठ्या प्रमाणात माती आल्याने सुमारे सव्वा ते दीड महिने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती गणेश उत्सव काळात फक्त सावंतवाडी पर्यंत गाड्या सोडण्यात आल्या होत्या कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पाहणी करून १६ सप्टेंबर पासून कोकण रेल्वे पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती दिली नंतर गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०२० पासुन कोकण रेल्वेची कोलाड रोरो सेवा सुरळीत सुरु करण्यात आली आहे.
कोलाड रेल्वेची रोरो सेवा पेडणे (गोवा)या भोगद्यावर प्रचंड प्रमाणात माती आल्याने बंद करण्यात आली होती. त्याअगोदर भारतदेशासह संपुर्ण जगभरात कोरोना विषाणु वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता त्याला आळा घालण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला होता. अत्यावश्यक वस्तूंची सेवा वगळता सर्व वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यामुळे कोलाड कोकण रेल्वे रोरो सेवेला मोठा फटका बसला असुन, यामुळे कोकण रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.
एका बाजुला कोरोना विषाणुने जगात हाहाकार माजवला असतांना शासकीय यंत्रणा त्यावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत असतांना, दुसरीकडे त्याचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी संपुर्ण भारत देशातील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती व यामध्ये अत्यावश्यक सेवेची माल वाहतुक सेवा सुरु ठेवली होती.
कोलाड कोकण रेल्वेची रोरो सेवा अनेक वर्षापासून सुरु असुन या रोरो सेवेमुळे मुंबई, ठाणे,पुणे,रायगड,येथील औद्योगिक क्षेत्रातील माल, याच बरोबर किराणा,फळे,व इतर वस्तु याचा माल वाहतुक कोलाड ते सुरतकर सुमारे ७९० किमी अंतरावर अतिशय कमी खर्चात जात होता. या रोरो सेवेत एकाच वेळी ४५ते ५० मालवाहू ट्रक जात होते परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक वगळता सर्व वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोलाड रोरो सेवा येथुन मेडिकल औषधे व अत्यावश्यक वस्तु यांची फक्त ८ते १०मालवाहू ट्रक सोडले जात होते.
त्यानंतर मागील दीड महिन्यांपूर्वी प्रचंड मोठया प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पेडणे भोगदयावर माती आल्याने कोलाड रोरो सेवा बंद करण्यात आली. कोकण रेल्वेचे व्यस्थापकिय संचालक संजय गुप्ता यांनी मुंबई गोवा कोकण रेल्वेची दोन वेळा पाहणी केली होती. नंतर पेडणे भोगदयाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेची कोलाड रोरो सेवा सुरळीत सुरू करण्यात आली आहे