नवी दिल्ली : यावर्षी स्वच्छता सिटी सर्वेमध्ये नवी मुंबईने बाजी मारली आहे. स्वच्छता सिटी सर्वेत नवी मुंबईने तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील सुरतने दुसरा क्रमांक मिळवला आहे. नवी मुंबईला मागे सारून आद्योगिक शहर असलेल्या सुरतला दुसरा क्रमांक देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्वेत सलग चौथ्यावेळी इंदौरने बाजी मारली आहे, इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.
विशेष म्हणजे, या सर्वेत सर्वात घाणेरडे शहर, बिहारची राजधानी पाटणा ठरले आहे, जे रँकिंगमध्ये शेवटच्या 47 व्या नंबरवर आहे. स्वच्छता सिटी सर्वेत पाटणाचा स्कोअर 1552.11 आहे. पूर्व दिल्लीनंतर पाटणाचा नंबर आहे. पूर्व दिल्लीचा स्कोअर 1962.31 आहे. सर्वात स्वच्छ शहर इंदौरचा स्कोअर 5647.56 आहे. हे रँकिंग 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणार्या शहरांचे आहे, ज्यांची संख्या देशात 47 आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले की, गुजरातचे औद्योगिक शहर सूरत, भारतातील सर्वात दुसरे स्वच्छ शहर आहे. प्राचीन पवित्र शहर वाराणसी गंगा नदीच्या किनारी वसलेले सर्वात स्वच्छ शहर आहे. पीएम नरेंद्र मोदी याच मतरदार संघातून लोकसभेसाठी निवडूण आले आहेत, असे पुरी यांनी म्हटले.