गुड न्यूज! एक ऑगस्टपासून नवीन कार किंवा टू-व्हिलर खरेदी करणं होणार स्वस्त

नवीन कार किंवा बाइक खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एक ऑगस्टनंतर नवीन कार किंवा बाइक खरेदी करताना पैशांची बचत होणार आहे. कारण, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) विमा कंपन्यांना ‘लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज’ न विकण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच नवीन वाहन धारकांना गाडी खरेदी करतेवेळी ‘लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज’ घेणे बंधनकारक नसेल. याचा थेट परिणाम वाहनांच्या ‘ऑन रोड’ किंमतीवर होणार असून वाहने स्वस्त होतील.

IRDA च्या आदेशामुळे एक ऑगस्टनंतर ऑटो इन्शुरन्ससाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. एक ऑगस्टपासून कार आणि टू-व्हिलरच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बदल होणार आहेत. IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांना जून महिन्यात लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज न विकण्याचे आदेश दिले होते. एक ऑगस्टपासून त्याला सुरूवात होईल. याअंतर्गत तीन किंवा पाच वर्षासाठी मोटर वाहन वीमा अनिवार्य करण्याचा नियम संपुष्टात आला आहे.

जून महिन्यात IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांसाठी हा नवीन आदेश जारी केला होता. यापूर्वी 2018 च्या ऑगस्टमध्ये लाँग टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा नियम लागू झाला होता. याअंतर्गत नवीन कार खरेदीवर 3 वर्षाची पॉलिसी आणि सप्टेंबर 2018 पासून दुचाकीसाठी 5 वर्षांची इन्शुरन्स पॉलिसी घेणं बंधकारक झालं होतं. पण आता IRDA ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर वाहनांसाठी लॉन्ग टर्म पॉलिसी बंधनकारक नसेल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता विमा कंपन्यांना केवळ 1 वर्ष ऑन डॅमेज पॉलिसीचीच विक्री करता येणार आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार असून त्यांच्या पैशांची बचत होणार आहे.