गुळसुंदे आदिवासीवाडी येथे मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन

gulsunde
पनवेल (संजय कदम) : तळोजे औद्योगिक वसाहतीमधील व्हीस्टा प्रोसेस फुड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने व गाडगीळ गुरुजी सामाजिक व शैक्षणिक संस्था याच्या वतीने गुळसुंदे येथील आदिवासीवाडी येथे मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये सुमारे 100 हुन अधिक आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
तळोजे औद्योगिक वसाहतीमधील व्हीस्टा प्रोसेस फुड प्रायव्हेट लिमिटेड, पी.एच.सी.आपटा व शंकरा आय इन्स्टिटय़ूट सहकार्याने तसेच गाडगीळ गुरुजी सामाजिक व शैक्षणिक संस्था गुळसुंदे याच्या वतीने आयोजित या मेडिकल चेकअप कॅम्पचे पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कॅम्पमध्ये सुमारे 100 हुन अधिक आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासण्या करण्यात आल्या तसेच आजारांच्या अनुषंगाने औषधे वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे तपासणीअंती काही गंभीर आजार उद्भवल्यास व खर्चिक उपचार करावा लागल्यास अश्या रुग्णांना गाडगीळ गुरुजी सामाजिक संस्थेच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच शंकरा आय इन्स्टिटय़ू च्या माध्यमातून डोळ्यांच्या संदर्भातील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून चष्म्याचेही मोफत वाटप करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, नायब तहसिलदार नाईक, सामाजिक कार्यकर्ते व विस्टा फूड्सचे सल्लागार चंद्रशेखर सोमण, उद्योजक इक्बाल काझी, शंकरा आय इन्स्टिटय़ूट च्या रोहीणी खाडे, रसायनी पोलीस स्टेशन उपनिरीक्षक बालवडकर, चार्टंन्ड आकाउन्टट श्री.सिंगासने, व्हीस्टा फुड कंपनीचे अधीकारी सौ. इंद्रायणी आगलावे, प्रवीण ठाकुर, कमलेश शिर्के, प्रथमेश पाटील, पत्रकार अनिल भोळे, बी.एस.कुलकर्णी, सरपंच हरीश बांडे,आर.डी.पाटील, ग्रामस्थ जीतेंद्र गाताडे, अजिंक्य सुर्वे, शेखर पाटील, संतोष चौलकर, जयवंत महाडीक, समाधान पाटील, नीखिल पाटील, सुभाष केदारी, दतात्रय शीगवण, काशीनाथ गाताडे, आरोग्य अधिकारी डॉ. उरणकर, डॉ.थोरात, परिचारीका तसेच व संस्थेचे पदाधीकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *