महाड (रवी शिंदे) : संपूर्ण तालुक्यांत गेल्या दोन ते तिन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे हाःहाकार उडाला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल आहे गेली दोन दिवस सावित्री गांधारी आणि काळ नद्यानी धोक्याची पातळी ओला डली परिणामी शहारात दोन दिवस पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी नागरीकांची त्रेधातिरपीट उडाली आहे
दरम्यान संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता तटरक्षक दलाची एक टिम आणि स्थानीव बचाव पथक तैनात ठेवण्यात आल आहे शहरांतील सखल आणि धोकादायक ठिकाणच्या २५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल असून पावसाचा जोर आणखी वाढत असल्यामुळे प्रशासना कडून वारंवार सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे
गेल्या ४८ तासांत २४८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून अद्याप संपूर्ण तालुक्यात धुवाँदार पाऊस बरसत आहे यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतांना अनेक गांवाचा संपर्क तुटला असून दळणवळणावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे पावसाचा वाढता जोर पहाता आता महापूरापेक्षा तालुक्यावर आता दरडींची टांगती तलवार लटकत आहे यामुळे आता सर्वत्र भितीच वातावरण पसरल आहे
महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार तहसिलदार चंद्रशेन पवार मुख्याधिकारी जिवन पाटील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आज महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनीही संपूर्ण शहरासह तालुक्यात पूरपरिस्थितीची पहाणी करून शासकीय अधिकाऱ्याकडून आढावा आणि उपाय योजनांची माहिती घेतली यावेळी त्यांच्या समवेत शहर प्रमुख नितीन पावले सिध्देश पाटेकर आदी उपस्थित होते
अतिवृष्टी आणि महापुराचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क राहिली आहे महाड सारखा संवेदनशील भागाचा विचार करता येथे तटरक्षक दलाच पथक तैनात ठेवण्यात आल आहे या दलाचे दोन अधिकारी १० जवानांचे पथक ट्रक बोट बोट लाईफ जाकेट व्हिएचएफ सेट लाईफ बोया या बचाव साहित्यासह महाड येथे राखल झाले आहे याखेरीज महाड येथाल एक व्यावसायीक प्रशांत साळुंखे यांनी आपल्या पाच बोटी पंधरा स्वंयसेवक पंधरा लाईफ जॅकेट महाड नगरपालिकेला उपलब्ध करून दिल्या आहेत नगरपालिकेच्यही दोन बोटी तैनात करण्यात आल्या असून त्यांनी सातत्याने महाड शहरांत गस्त सुर आहे