पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील एका गोडावून मधील पत्राचे शेडचे पत्रा उचकटून आत प्रवेश करून अज्ञात इसमाने ८० हजार रुपयांचे माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पळस्पे येथील मॅरॉथॉन नेक्झॉन येथील कंपनीच्या गोडावूनचे पत्राचे शेडचा पत्रा उचकटून आत मध्ये प्रवेश करून एका अज्ञात इसमाने गोडावून मध्ये ठेवलेले मायवानच्या त्रिकोणी आकाराच्या ९५ प्लेट ज्याची किंमत सुमारे ८० हजार रुपये इतकी आहे ती चोरून नेली. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.