गोरगरिबांचा रेशनिंगचा तांदूळ काळाबाजारात; पळस्पे जवळील गोडाऊनमधून २७० मेट्रीकटन तांदुळ जप्त

पेण (गणेश म्हात्रे) : गोरगरिबांना शिधावाटप केंद्रात मिळणाऱ्या धान्याची परदेशात काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पनवेल पोलीसांनी पर्दाफार्श केला असून ८० कोटी किंमतीचे २७० मेट्रीकटन तांदुळ जप्त केला आहे. काळाबाजार करणाऱ्या १८ आरोपींचा समावेश असून तीन आरोपी कर्नाटकातील आहेत.

देशभरातील गरीब जनतेला नियमित मिळणाऱ्या धान्या बरोबरच कोरोना काळात केंद्र सकरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला माणसी पाच किलो तांदूळ मोफत देण्यात आलेले आहे. रेशनिंवरील काही धान्य रेशनिंग धारकांना न देता ते साऊथ आफ्रिकन देशात निर्यातीसाठी पाठविले जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पनवेल पोलीसांनी प्रथम पनवेल जवळील पळस्पे येथील टेक केअर लॉजिस्टीकमधून तांदूळ जप्त केला. त्यानंतर भिवंडीमधून जय आनंद फुड कंपनी मिरांडे इंडस्ट्री, खालापूरमधून झेनिथ इम्पाक्स कंपनी आणि जय फूड प्रोडक्शन कंपनीतून तब्बल ९१ लाख १२ हजार ४६ रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला आहे. रेशनिगचा तांदूळ कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यातून आणण्यात आला होता.

नवीमुंबई पोलिस आयुक्तलय अंतर्गत पोलीसांच्या विशेष पथकाने २७० मेट्रीक टन तांदूळ जप्त केला आहे. गेल्या आठ महिन्यात ३२ हजार ८२७ मेट्रीक टन तांदूळ या साऊथ आफ्रीकन देशात निर्यात केला आहे. त्याची किंमत ८० कोटींच्या घरात असून आतापर्यंत १८ आरोपी असून कर्नाटकमधून तीन जणांना नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.

दरम्यान सरकार गरिबांसाठी वाटप करीत असलेले तांदूळ ही टोळी शिधावाटप करणाऱ्या दुकानदाराला हाताशी धरुन मिळवत होता. कोरोना काळात बायोमेट्रीक पद्धत बंद केल्याने दुकानदारांनी याचा फायदा उठवला होता. महाराष्ट्रा प्रमाणे कर्नाटक, हरियाना या दोन राज्यातील तांदूळ या ठिकाणच्या गोडाऊनमध्ये आणण्यात आला होता. दुसऱ्या गोणीमध्ये भरून तो आफ्रिकन देशात निर्यात केला जाणार होता.