गोवर रूबेलाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम उपाय – आयुक्त गणेश देशमुख

pl1
पनवेल (संजय कदम) : गोवर रूबेलाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे. यापूर्वी आपण कोरोनावर मात केली आहे आता गोवर रुबेलाला पळवून लावू यासाठी घराघरात-परिसरात जनजागृती करा व लस घ्या असे आवाहन पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी आज तळोजा येथील नॅशनल उर्दू प्राथमिक, माध्यमिक शाळेत जनजागृती अभियाना अंतर्गत उपस्थित विद्यार्थी शिक्षक व पालक वर्गांना मार्गदर्शक करताना केले.
यावेळी व्यासपीठावर आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्योजक इकबालभाई काझी, याकुब बेग माध्यमिक शाळेचे ट्रस्टी व मा. नगरसेवक मुकीद काझी, मा.नगरसेवक पापा पटेल, मा.नगरसेवक हरेश केणी, महापालिका प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. पटेल, डॉ.शेख, तळोजा येथील सामाजिक कार्यकर्ते आरिफ पटेल, जवाद पटेल, नाविद पटेल, ताहीर पटेल, मुनाफ सय्यद, उलमा कमिटी सदस्य, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त गणेश देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना गोवर लसीकरण केले नाही तर पुढे जाऊन होणारे दुष्परिणाम आणि लसीकरणामुळे होणारे फायदे याची माहिती दिली. त्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
तर पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्योजक इकबालभाई काझी यांनी सांगितले कि, कोरोनाच्या काळामध्ये तळोजा भागात लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे या भागात कोरोनाचा ज्यादा फैलाव झाला नाही. आगामी काळात येथील नागरिक गोवर रुबेलासंदर्भात सुद्धा परिसरात जगजागृती करून आपल्या लहान मुलांचे लसीकरण करून घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मा.नगरसेवक मुकीद काझी यांनी बोलताना सांगितले कि, व्हॅक्सिन हि चांगली गोष्ट आहे त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. यासाठी सर्वांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी व त्यांच्याकडे गोवरची लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या वैद्यकीय विभागाकडे जाऊन लसीकरण करून घ्यावे.
तसेच मा.नगरसेवक हरेश केणी यांनी सुद्धा लक्षणे दिल्यास त्वरित लसीकरण करून घ्या. जसा तळोजाकरांनी कोरोनाला पळवला तसेच गोवरला सुद्धा आपल्याला पळवायचा आहे.
यासाठी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख हे जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबवीत आहेत.याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *