गोवे ग्रामपंचायतीवर सरपंच महेंद्र पोटफोडे तर उप सरपंच नितीन जाधव होणार विराजमान

shyam26

कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील 15 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या एकवीस ग्रामपंचायत निवडणुकीमधील कोलाड खांब देवकान्हे विभागातील नावलौकीक असलेली गोवे ग्रामपंचायत आहे येथील ग्राम पंचायत निवडणुकीत नऊ पैकी सात जागा राष्ट्रवादीने बिनविरोध जिंकल्या होत्या तर उर्वरीत दोन जागेसाठी  निवडणूक झाली होती

shyam27

सुदैवाने या दोन जागा राष्ट्रवादीने बहुसंख्ये मताधिक्य घेत जिंकल्या त्यामुळे नऊ पैकी नऊ जागा या राष्ट्रवादीने कायम राखत विरोधकांना धूळ चारीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला तद्नंतर सरपंच पदाची सोडतीत ही सर्वसाधारण पुरुष असल्याने गोवे मुठवली शिरवली ग्रामस्थ महिला वर्ग तसेच युवक युवती यांच्या सर्वांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने सरपंच पदाच्या खुर्चीवर कोलाड खांब देवकान्हे विभागातील युवकांचे मार्गदर्शक आधारस्तंभ तथा युवा कार्यसम्राट उच्चशिक्षित शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोविड काळात गरजू आणि गरीब कुटूंबना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू घरपोच देत त्यांचे कुटूंब सावरणारा खरा युवा कार्यकर्ता महेंद्रशेठ (दादा) नामदेव पोटफोडे तर उपसरपंचपदी नितीन तानाजीशेठ जाधव हे बिनविरोध विराजमान होत असल्याने या विभागातील युवक वर्गासह जेष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांचा उत्साह मोठा शिगेला पोहचला असल्याचा आनंद सर्वत्र दिसून येत आहे.

कोकणचे भाग्यविधाते तथा कोकण विकासाचे  खा. सुनील तटकरे यांच्या कृपाआशीर्वादाने पालकमंत्री आदिती तटकरे आ. अनिकेत तटकरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षण महर्षी तथा मा.रा.जि.प.चे उपाध्यक्ष रा. ग.पोटफोडे (मास्तर) मा. सरपंच रामशेठ कापसे ,जेष्ठ नेते रामचंद्र जाधव,तानाजीशेठ जाधव, नथु शिंदे ,प्रवीण पवार,बाळकृष्ण भोसले,तानाजी मोरे,युवा कार्यकर्ते विजय पवार,संदीप जाधव,नरेंद्रशेठ जाधव ,संदेश कापसे ,भाई पोटफोडे,रमण कापसे,भरत जाधव,किरण पवार,मंगेश पोटफोडे,यांच्या अथक प्रयत्नातून व नवनिर्वाचित निवडून आलेल्या सर्व ग्राम पंचायत सद्स्य यांच्या सहकार्याने नव्या ऊमिदीचे तरुण तडफदार माजी रोहा तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष व नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे हे 10 फेब्रुवारी रोजी गोवे ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी व उपसरपंचपदी नितीन जाधव हे विराजमान होत असल्याने गोवे ग्राम पंचायतीत एक होतकरू आणि कर्तबगार तसेच विकास कामांना चालना देणारे युवा व्यक्तिमत्व सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होत असल्याने ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांसह कोलाड खांब देवकान्हे विभागातील युवकांचा उत्साह शिगेला पोहचला असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे ,