गोवे ग्रा.पं.सरपंचपदी महेंद्रशेठ पोटफोडे  यांची तर उपसरपंचपदी नितीन जाधव विराजमान

shyam28

कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रा.पं.निवडणुकीत बहुमताने सत्ता प्रस्थापित केलेल्या ग्रु.ग्रा.पंचायत गोवे ग्रा.पंचायतीच्या आज झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाचे निवडणुकीत सरपंचपदी तरुण तडफदार युवकांचे आधारस्तंभ उच्शिक्षित आणि कर्तबगार महेंद्रशेठ पोटफोडे  यांची तर उपसरपंचपदी नितीन जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून गोवे ग्रा.पंचायतीचे विकासकामांसाठी नेहमीच झुकते माप मिळाल्याने व मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपल्या ग्रा.पंचायतीचा विकास करू शकतो हा सुज्ञ मतदारांचा ठाम विश्वास असल्याने मतदारांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुनश्च सत्तेची नऊ पैकी सात उमेद्वार बिनविरोध तर दोन सदस्य बहुसंख्ये मताधिक्य देत संधी दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ग्रा.पंचायतीवर आपले निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित करून येथील नऊ पैकी नऊ सदस्य बहुसंख्ये मताधिक्याने निवडून आणले .

आज 10 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या सरपंचपदासाठीच्या सोडतीत सर्वसाधारण आरक्षण पुरुष असल्याने सरपंच पदासाठी या ठिकाणी शिरवली, मुठवली, गोवे, येथील सर्व ग्रामस्थ तसेच नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य  नागरिकांनी एकत्रितपणे येत सर्वांगिक गावच्या विकासासाठी विचार करत सदस्यांची संख्याही मोठी असल्याने पहिल्या सरपंच पदाचा बहुमान तसेच पक्षश्रेष्ठींनी योग्य निर्णय घेऊन पहिला सरपंचपदाचा बहुमान शिरवली गावचे सुपुत्र तथा न शि प्र मं खांबचे अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे यांचा नावावर शिक्कामोर्तब करत सरपंचपदासाठी व उपसरपंचपदी नितीन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

shyam30

या निर्णय प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गुंड यांनी काम पाहिले.यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे ,मा.सरपंच रामशेठ कापसे, संदेश कापसे, जेष्ठ नेते तानाजी जाधव विलास पवार ,आंबेवाडी उपसरपंच श्रीकांत चव्हाण, राकेश शिंदे ,संजय माडलूस्कर, प्रवीण पवार ,नंदा कापसे, मंगेश पोटफोडे, नरेंद्र जाधव ,संदीप जाधव, भाई पोटफोडे, नथु शिंदे, लहू पिंपळकर ,अजय कापसे ,सुरेश जंगम, नरेंद्र माळी ,किशोर जाधव, राजेंद्र जाधव, शांताराम पवार, नितीन जवके, रामचंद्र पवार ,आदी उपस्थित होते तसेच नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य नरेंद्र पवार , सुप्रिया जाधव, रंजिता जाधव, अंजली पिंपळकर,  सुमित गायकवाड ,भावना कापसे, निशा जवके,तलाठी हिंदोळे, ग्राम सेवक शिद, कर्मचारी मयुरी जाधव, रामचंद्र कापसे, आदी गोवे शिरवली मुठवली ग्रामस्थ महिला युवक व युवती बहुसंख्येने उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व सदिच्छा यावेळी दिल्या,