गोवे येथील राघवेंद्र पवार यांनी घरगुती गणपती सजावटीतून दिला कोरोना जनजागृतीचा संदेश !

कोलाड (श्याम लोखंडे ) : गणपती उत्सव  सजावटीच्या माध्यमातून समाजप्रबोधन व जनजागृती घडावी या उद्देशाने उत्सव काळात अनेकजण विविध स्तुत्य व अभिनव उपक्रम राबवताना दिसतात. याच भावनेतून कोलाड गोवे येथील कोलाड विभागीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विलास पवार यांचे चिरंजीव राघवेंद्र  व त्यांची पत्नी सौ राधिका पवार दाम्पत्य यांनी आपल्या घरगुती गणपती सजावटीतून साकारले कोरोनाबाबत जनजागृती करणारे देखावा. याबरोबरच गणपतीच्या दर्शनासाठी येणार्‍या गावातील युवा पिडी नागरिक  व बहुसंख्येने महिला वर्गासाठी कोरोना पासून बचावपर जनजागृतीच्या माध्यमातून सजावटीत संदेश दिला आहे.
देशासह संपूर्ण जगाला कोरोना महामारीने विळखा घातला आहे. शासनाकडून याबाबत अनेक उपाय योजना व त्या बाबत जनजागृती केली जात आहे.परंतु राघवेंद्र व पत्नी राधिका  यांनी स्वयंस्फूर्तीने अशा अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव सजावटीत प्रबोधन व जनजागृती केली आहे.
गणरायासमोर कोरोनापासून कसा बचाव करावा? कोणती खबरदारी व काळजी घ्यावी? काय करावे? राज्यात व देशात या बाबत कशा उपाय योजना केल्या जात आहेत असे विविध संदेश फलक बाप्पाच्या सजावटीमध्ये लावले आहेत. तसेच प्रतिकृती बनविल्या आहेत. या जोडीला कोव्हीड-19 विषाणूंच्या अनेक प्रतिकृती देखील केल्या आहेत. दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येकाचे हे प्रतिकृती व संदेश फलक लक्ष वेधत आहेत. त्याचबरोबर आपली सुरक्षा आपल्या हातात प्रत्येकाची सुरक्षा होत आहे. त्यामुळे राघवेंद्र व पत्नी राधिका  यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र परिसरात  कौतुक होत आहे.