पनवेल (संजय कदम) : पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत भाजपाला धूळ चारला त्याप्रमाणे या करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीही सर्वच्या सर्व जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील यांनी व्यक्त केला. करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने करंजाडे येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील, काँग्रेस जेष्ठ नेते आर.सी.घरत, तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, शेकाप जेष्ठ नेते काशिनाथ पाटील, कर्जत नगराध्यक्ष ज्योती ताई, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी नेते खर्जे, राजकुमार पाटील, नंदराज मुंगाजी, मल्लिनाथ गायकवाड, विक्रांत घरत, संदीप म्हात्रे, माधुरी गोसावी, मेघाताई, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते.
पनवेल तालुक्यामध्ये येणाऱ्या 18 डिसेंबर रोजी दहा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. करंजाडे ग्रामपंचायत मध्ये विद्यमान सरपंच रामेश्वर बबन आंग्रे हे पुन्हा एकदा थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे अकरा सदस्य केलेल्या विकास कामांच्या जोरावरती मतांचा जोगवा मागत आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी करंजाडे येथे शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित व बहुजन आघाडी अशा मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडी, रामेश्वर आंग्रे आणि अकरा सदस्यांच्या जयघोषाच्या घोषणांनी करंजाडे परिसरात आसमान दुमदुमले होते.
भाजपच्या आमदारांनी करंजाडेसाठी किती निधी खर्च केला ?
करंजाडेचा विकास आम्हीच केला अश्या थापा मारणाऱ्या भाजप पक्षांच्या नेत्यांनी व आमदारांनी आमदार यांच्या निधीतून करंजाडेसाठीचा नेमका कोणकोणते विकासकामे केलीत अहंडी त्यांनी जाहीर करावे. मात्र असे होणार नाही. करंजाडेच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात आमचा उमेदवार रामेश्वर आंग्रे यांनी प्रत्येक समस्येससाठी दिवसरात्र झटत. प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपला मतदार त्यांची जागा नक्की दाखवेल. असा टोला शिवसेना सल्लागार व महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी लगावला आहे.
बाराच्या बारा उमेदवार निवडून भाजपचे बारा वाजवायचेत – आर.सी.घरत
ज्यावेळेला काँग्रेस ची सत्ता होती. त्यावेळी गॅस महाग झाल्यावर महिला रस्त्यावर उतरले होते. मात्र आता भाजपची सत्ता असताना गॅसचे दर गगनाला भिडले असताना रस्त्यावर कोणी उतरायला तयार नाही. पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत सर्वसर्वच्या जागा जिंकून भाजपला कोसोदूर आपण नेवून ठेवला आहे. सदाशिव साबळे हे पहिले काँग्रेसचे सरपंच होते. नंतर शेकापमध्ये गेले. शेकापमुळे नावारूपाला आले. पक्ष बदलला नसता तर ते आज काँग्रेसच्या नावाने असते. आज त्यांच्या नावाने जे सांगतात, त्यांना विनंती आहे कि, कितीवेळा पक्ष बदलणार.
आज महापुरुषांचे अपमान होत असताना दोन्ही आमदारांनी अपमानाच्या बाबतीत कुठेही निषेध केलेला नाही. मात्र मा.चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक केल्यानंतर दुसर्याच दिवशी पनवेलच्या आमदारांनी या निषेधार्थ मोर्चा काढला. परंतु छत्रपती शिवाजी माहाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ज्यांनी अपमान केला, त्यांच्या बाबतीत कधीही निषेधच्या शब्द काढले नाही, अश्या भाजपला तुम्ही मत देऊन उभे करणार आहेत का ? असा सवाल काँग्रेस चे जेष्ठ नेते आर.सी.घरत यांनी व्यक्त केला. यावेळी आपले बाराच्या बारा उमेदवार निवडून आणून भाजपचे बारा बाजवायचे असल्याचे घरत म्हणाले.
कर्ना शेलार यांच्यावर शेकापचे उपकार आहेत — राजेंद्र पाटील
करंजाडे येथील कर्ना शेलार यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाने व विवेक पाटील यांचे इतके उपकार आहेत कि त्यांनी आयुष्यातील पुंजी लावलाय तरी ते कमी पडतील इतके उपकार आहे. हे जर विसरले असतील. तर महविकास आघाडी हे शेलार यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही असा विश्वास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. माननीय राज्यपाल, रावसाहेब दानवे, यांनी छत्रपतींचा अपमान केला. मात्र उदयनराजे भोसले यांचा अभिनंदन करेन कि ते त्या पक्षाचे असूनसुद्धा त्यांनी विरोध केला. शेलार सुद्धा मराठा असतील, शेलारांनी या विषयाचा निषेध करायला पाहिजे होता. त्यामुळे येथील कुठल्याही मराठान्या मत मागण्याचा अधिकार या मंगेश शेलारला नाही असे पाटील यांनी सांगितले. यावेळी रामेश्वर आंग्रे यांचा शंभर टक्के विजय आहे ही खात्री असल्याचे पाटील म्हणाले.
करंजाडेच्या प्रतिनिधित्व एका स्मार्ट सरपंचाने करावे – विक्रांत घरत
करंजाडे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हायाला पाहिजे होती. तिला निवडणुकीचे स्वरूप पाहायला मिळत आहे. मात्र रामेश्वर आंग्रे यांचा विजय हा निश्चितच होणार आहे. ग्रामस्थानी पाठींबा देत रामेश्वर याना सरपंच पदासाठी उभे केले आहे. सर्वानी एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे. आंग्रे हे एक सुशिक्षित उमेदवार आहेत. दोन्ही पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये एक गोस्ट सामान आहे. करंजाडेच प्रतिनिधित्व एका स्मार्ट सरपंचाने करावं. मात्र स्पेर्धेमधे असलेले सरपंचामध्ये शैक्षणिक कामगिरी, उपलब्धी जी आहे. ती कामगिरी फक्त रामेश्वर मध्ये आहे. त्यामुळे रामेश्वर आंग्रे सारख्या स्मार्ट सरपंचाला भरघोस मतांनी मतदार निवडून देतीलच.
विरोधकाला पाच वर्षात समस्यां दिसल्या नाहीत का – शिवाजी वाघमारे
रामेश्वर आंग्रेची संपूर्ण टीम करंजाडेच्या प्रत्येक समस्येसाठी अहोरात्र झटत आहेत. करंजाडेच्या पाण्याच्या प्रश्नावर हंडामोर्चाचे काढला. आणि सिडकोला ठणकावले आणि पाण्याचा प्रश्न सोडविला. गेल्या पाच वर्षांमध्ये करंजाडेमध्ये कोणकोणत्या समस्यां आहेत. हे विरोधकांना दिसल्या नाहीत का. आणि आता निवडणूकीत उभे राहिल्यावरच येथील समस्यां समजल्या का ? असा सवाल शिवाजी वाघमारे यांनी विरोधकांना केला आहे.
सिडको अध्यक्ष भाजपच असताना पाणी प्रश्न का सोडविला नाही – खर्जे
करंजाडे हे मेट्रोपोलियन शहर झालाय. येथील मतदारांना फसवण्याचे दिवस संपलेले आहेत. ज्या पाण्यासाठी रामेश्वर आंग्रे येथील रहिवाश्यांसाठी झुंझत होते. त्यावेळी तुमचेच सिडकोचे अध्यक्ष होते. तर तुम्ही हा प्रश्न पहिले का सोडवील नाही असा टोला राष्ट्रवादीचे नेते खर्जे यांनी लगावला. तसेच चांगला करणाऱ्या उमेदवाराला पुन्हा एकदा संधी देऊन निवडून आणा.
आमच्या कामाच्या जोरावर आम्ही मत मागतोय – रामेश्वर आंग्रे
आम्ही जे कामे केलीत तीच कामे भाजच्या उमेदवारांनी जाहीरनाम्यात दाखवलीत, खरं तर आमच्या बरोबर राहून आमची कामे चोरलेत असा थेट आरोप सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांनी केला आहे. शासकीय पातळीवर भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने केंद्र राज्य आणि सिडकोच्या माध्यमातून करंजाडेच्या प्रगतीसाठी आवश्यक गोष्टी करतोय असं विरोधी पक्षाकडून बोलतात, खरं तर भाजप कडून करंजाडेसाठी कोणकोणती विकास कामे केली त्यांनी जाहीर करावे, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने जलकुंभ उभारल्याचे सांगतात मात्र फक्त जलकुंभ उभारून तहान भागणार नाही, गेल्या एक वर्षांपासून करंजाडेवर पाणी टंचाईचे संकट उभारले होते त्यासाठी जनआंदोलन उभारले, पाठपुरावा केला. त्यावेळी भाजप पक्ष कुठे होता.
प्रकल्पबाधित आदिवासींचे पुनर्वसन केले बोलतात. मात्र त्यांना मिळणारी नुकसान भरपाई व हक्काची जागा मिळाली का ? याचे भाजाप पक्षाने परीक्षण करावे. आदिवासी बांधवांच्या सेवेसाठी फिरता दावाखाना सुरु केला भाजप वाले बोलतात मात्र या फिरता दवाखाना व ऍम्ब्युलन्स सेवेची खरी गरज कोरोना काळात होती. त्यावेळी कुठे लपून बसले होते हे भाजपचे सच्चे कार्यकतें, असा थेट आरोप महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांनी केला आहे.