पेण तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

voting-gram-panchayat
पेण (राजेश प्रधान) : पेण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान उत्सुकता पार पडले.
एकुण २६ पैकी १ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने तालुक्यातील करोटी आंबिवली, सावरसई, वाशिवली, कणे, कोलेटी, निगडे, वरप, पाटणोली, हमरापूर, कळवे, आमटेम, डोलवी, जिते, दुरशेत, वरसई, दादर, सोनखार, कोप्रोली, मसद बुद्रुक, सापोली, रोडे, खरोशी, काराव, मुंढाणी या २५ ग्रामपंचायतीत मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती.
२५ ग्रामपंचयतीमध्ये एकूण २२०५० पुरुष मतदार तर २२१५५ स्त्रीया मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य पदी उभे असलेल्या उमेदवाराचे भविष्य मत यंत्रात बंद करणार आहेत. या निवडणुकांसाठी ८३ मतदान केंद्रावर मतदान करण्यात आले.
सकाळी ९:३० ते ११:३० दरम्यान झालेल्या मतदानात स्त्रीया ४९४४(२२.३२%),तर ४६२५(२०.९८%) मतदारांनी मतदान केले तर यवेळी एकूण ९५६९ मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी २१.६५ अशी होती. तर दुपारी १:३० वाजेपर्यंत एकूण २५५६३ मतदान झाले तर ५७.६३ % मतदानाची टक्केवारी होती,दुपार नंतर ३२३७६ मतदारांनी मतदान केले तर ७३.२३१ %  मतदानाची टक्केवारी दुपार नंतर दिसून आली,मोठ्या संख्येत हजर राहून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीची सुरु असलेली प्रक्रिया अत्यंत शांतपणे सुरु होती निवडणूक आयोगाकडून एकूण ९३ कर्माचारी निवडणुकीचे काम पाहात होते. निवडणुकीला कुठलेही गालबोट लागून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊन यासाठी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गोविंदराव पाटील व वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तानाजी नारनवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
२६ ग्रामपंचायती मधील मळेघर ग्रामपंचायत बिनविरोध झाली असल्याने २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठीची निवडणूक मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *