नागोठणे (महेंद्र माने) : रोहा तालुक्यातील पिगोंडे येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने शुक्रवार 06 जानेवारी रोजी सरपंच संतोष कोळी यांच्या प्रमुख उपस्थिती वेलशेत व आंबेघर येथील अंगणवाड्यांना भेट वस्तु व खेळणीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात सरपंच संतोष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वेलशेत व आंबेघर येथील अंगणवाड्यांना टेबल,खुर्ची,कपाट, शेगडी,भांडी तसेच लहान मुलांना बसण्यासाठी खुर्ची व खेळणीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पिगोंडे उपसरपंच कांचन माळी, माजी उपसरपंच सखाराम घासे, ग्रा.पं.सदस्या गीता पाटील व कुसुम बावकर, ग्रामसेवक विजय अहिरे यांच्यासह मा.सदस्य सुधाकर पारंगे, अंगणवाडी सेविका कांचन पाटील, कांचन बावकर, सरगडे गुरुजी,पाटील गुरुजी, विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.