ग्रामीण प्रीमियर लीगचा मानकरी ठरला श्री धावीर इलेव्हन वजरोली संघ

mahesh

नागोठणे (महेश पवार) : नागोठणे विभाग ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग २०२१ चा मानकरी दिपक महाडिक व दिनेश किळंगे यांचा संघमालक असलेला श्री धावीर इलेव्हन वजरोली संघ ठरला आहे. तर द्वितीय क्रमांक संघ मालक किसन बोरकर यांचा प्रख्यात वारियर्स बाहेरशीव संघ, तृतीय क्रमांक संघ मालक तुकाराम कदम यांचा हर्ष इलेव्हन वाघळी संघ तसेच चतुर्थ क्रमांक संघ मालक शेखर ठाकुर यांच्या स्वराज इलेव्हन संघाने पटकाविला.

प्रथम क्रमांकास ३१ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास २१ हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग २०२१ ही स्पर्धा वाकण येथील कै. देविदास गायकर क्रीडांगण येथे १२ ते १४ फेब्रुवारी अशी तीन दिवस अत्यंत उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सतत सात विजय मिळविलेल्या बाहेरशिव संघास अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात वजरोली संघाने नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले व पाच षटकांच्या सामन्यात बाहेरशिव संघास ६७ धावांवर रोखले. ६७ धावांचे आव्हान वजरोली संघाने सहज रित्या पार केले व अंतिम सामन्यात विजय मिळविला. या सामन्याचा मेन ऑफ दि मॅच म्हणून वजरोली संघाचा सन्मिक लोखंडे यास गौरविण्यात आले.

उगवता तारा सितारा वजरोली संघाचा मयूर ठमके, उत्कृष्ठ क्षेत्ररक्ष वजरोली संघाचा हितेश कासार, उत्कृष्ट गोलंदाज बाहेरशिव संघाचा अतिश म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज व मेन ऑफ दि सिरीज वजरोली संघाचा उत्तम रेवाळे, सिक्सर टीम व पब्लिक हिरो स्वराज संघाचा ऋतिक माळी व क्रिकेट प्रेमी म्हणून अनिल कासार व रविंद्र भोसले आदींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच समालोचकाची भूमिका उत्कृष्ट जेष्ठ समालोचक पांडुरंग गायकर, पुंडलिक ताडकर व उत्कृष्ट युवा समालोचक अतिश सारले यांनी पार पडली.

बक्षीस वितरणाच्या प्रसंगी रोहा पं. स. चे माजी राष्ट्रवादीचे विभागीय नेते सदानंद गायकर, जेष्ठ नेते मधुकर ठमके, माजी राजिप सदस्य चंद्रकांत जांबेकर, पाटणसई माजी उपसरपंच पांडुरंग गायकर, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे संचालक शेखर ठाकुर, वांगणी माजी सरपंच एकनाथ ठाकुर, माजी उपसरपंच विनायक तेलंगे, मधुकर महाडिक, बाळासाहेब वाजे, वांगणी ग्रा. स. प्रमोद जांबेकर, पळस ग्रा. स. किसन बोरकर, पाटणसई ग्रा. स. दिपक महाडिक, हेमंत गायकर, अनंत पाटेकर, किशोर झेमसे, विनोद मोदी, सुभाष मढवी, भागवत जांबेकर आदींसह क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
जीपीएल क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक गायकर, मनोज वाजे, आकेश हारपाल, राकेश खांडेकर, मोहित, गायकर, कमलाकर तेलंगे, पंकज कोकाटे, उचेश कमतगी, अलंकार म्हात्रे, संदेश कासार, विश्वास गायकर, शरद भोईर आदींनी विशेष मेहनत घेतली तसेच मोहित गायकर याचे मोलाचे सहकार्य लाभले.