पनवेल (संजय कदम) : घरकामास राहून घरातील सोन्याचे दागिने चोरी करणार्या महिलेस गुन्हे शाखा कक्ष 2 ने 48 तासात अटक करून तिच्याकडून 3 लाख 30 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
ऑक्टोंबर व नोव्हेबर महिन्यामध्ये फिर्यादी यांचे घराचे रिनोवोशन असल्यामुळे फिर्यादी हे त्यांच्या बहिणीच्या घरी सत्यम हाईट्स, प्लॉट नंबर 81,सेक्टर 19, कामोठे येथे राहणेस होते. सदर घरामध्ये फिर्यादी यानी बेडरूमधील कपाटात त्यांचे आई वडिलांचे सोन्याचे दागिने ठेवलेले होते.
सदरचे सोन्याचे दागिने त्यांच्या घरामध्ये काम करणारी संकिता जाधव (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हिने चोरी केले असल्याच्या संशयावरुन कामोठे पोलीस ठाणे गु.र.न. क.293/2022 भा.द.वी. कलम 381 प्रमाणे नोंद करण्यात आला होता.
मालमत्ते संदर्भात घडलेल्या गुन्हयाची तात्काळ उकल करणे बाबत मा.पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई, मा.सह पोलीस आयुक्त सो, मा. अपर ’पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये , मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे यांनी आदेशीत केले होते.
सदर गुन्ह्याचा तपासाचे अनुषंगाने मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त यांचे मार्गदशानाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, गुन्हे शाखा कक्ष 02,पनवेल नवी मुंबई यांचे नेतृत्वाखाली पोलीस पथक नेमून सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असताना संशयीत महिला संकिता संतोष जाधव रा. सेक्टर 14, कामोठे हिस ताब्यात घेवून तिला विश्वासात घेवून तिच्याकडे कौशल्याने चौकशी केला असता तिने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले. सदर महिलेस अटक करुन तिच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेले एकुण 03,30,000/-रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल नवी मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संदीप गायकवाड, प्रविण फडतरे, पोउपनि. मानसिंग पाटील, वैभव रोंगे, सुदाम पाटील, सफौ. सुदाम पाटील, पोहवा अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, सचिन पवार, ज्ञानेश्वर वाघ, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, राहूल पवार, पोना अजिनाथ फुंदे, प्रफुल मोरे, मपोना/गायकवाड, मपोना/ सावंत, पोशि संजय पाटील, विंकात माळी, अजित पाटील यांनी केली.