कर्जत (गणेश पवार) : जानेवारी महिन्यात कर्जत तालुक्यात एक घरफोडी झाली होती. त्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान वडगाव – मावळ तालुक्यातील एका आरोपीपर्यंत पोहचला होता आणि त्यावेळी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करीत असता कर्जत, खोपोली, पुणे मधील अनेक गुन्हे उघडकीस आले असून ज्याच्या मदतीने हे गुन्हे केले आहेत तो सातारा जिल्ह्यातील एक आरोपीचे नाव समजले असून तो फरार आहे. हा तपास स्थानिक अन्वेषण शाखेच्या मदतीने सुरू होता.
कर्जत पोलीस ठाणे गुरनं 20/ 2022 भादवि कलम 457, 380 हा घरफोडीचा गुन्हा दिनांक 27/1/22 रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडून चालू होता.
सदर पथकातील पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांनी तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील संशयीत नितीन सुरेश तळावडे, वय 26 वर्षे, रा.टाकवे बुद्रुक, पोस्ट वडगाव मावळ, तालुका मावळ, जिल्हा पूणे यास ताब्यात् घेऊन त्याचेकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार आरोपी गणेश दिनेश वाईकर उर्फ गायकवाड, सातारा याचे मदतीने केला असल्याची कबुली दिली.
रु .70,500/- किंमतीचे वेगवेगळ्या कंपनी चे 6 मोबाईल (वरील गुन्ह्यातील 100% मालमत्ता हस्तगत )
पाहिजे आरोपी गणेश दिनेश वाईकर/गायकवाड याचा पूर्व इतिहास…..
1) हिंजवडी पोलीस ठाणे गु.रजि.नं 798/2022, आयपीसी 379,
2) हिंजवडी पोलीस ठाणे गु.रजि.नं 785/2022, आयपीसी 379,
3) हिंजवडी पोलीस ठाणे गु.रजि.नं 920/2021, आयपीसी 379,
4) हिंजवडी पोलीस ठाणे गु.रजि.न. 919/2021, आयपीसी 379
5) हिंजवडी पोलीस ठाणे गु.रजि.नं 813/2022, आयपीसी 379,
6)चाकण पोलीस ठाणे गु.रजि.नं 1367/2022, आयपीसी 379,
7) चाकण पोलीस ठाणे गु.रजि.नं 598/2021, आयपीसी 379,
8) चाकण पोलीस ठाणे गु.रजि.नं 1362/2022, आयपीसी 379
9) चाकण पोलीस ठाणे गु.रजि.नं 1375/2022, आयपीसी 379,
10) भोसरी पोलीस ठाणे गु.रजि.नं 666/2022, आयपीसी 379,
11)भोसरी पोलीस ठाणे गु.रजि.नं 722/2022, आयपीसी 379,
12) पिंपरी पोलीस ठाणे गुरनं 792/ 2022 , आयपीसी 379,
13) वाकड पोलीस ठाणे गुरनं 914/2021, आयपीसी 379,
14) देहूरोड पोलीस ठाणे गुरन 422/2022, आयपीसी 379,
15) चिंचवड पोलीस ठाणे गुरन 391/2022, आयपीसी 379,
16) नेरळ पोलीस ठाणे गुरनं 94/2022, आयपीसी 379,
17) नेरळ पोलीस ठाणे गुरन 95/2022, आयपीसी 379,
18) नेरळ पोलीस ठाणे गुरन 97/2022, आयपीसी 379.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोलिस हवालदार विकास खैरनार, पोलीस नाईक, ईश्वर लांबोटे, अक्षय जगताप, सहाय्यक निरीक्षक देवराम कोरम आणि सायबर सेल चे पोशी, अक्षय पाटील, तुषार घरत या पथकाने केली आहे.