अलिबाग : सीएफटीआय ट्रस्टच्या वतीने चित्रलेखा पाटील यांच्या मार्फत व्हेंटीलीटर मशीन भेट देण्यात आले असून त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव काळात रुग्णांना चांगला उपयोग होऊ शकेल. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांच्याकडे सदर व्हेंटीलीटर सूपूर्द करण्यात आले. डॉ पद्मश्री बैनाडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सीएफटीआयच्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले.
कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात असताना रायगड जिल्हा देखील या महामारीच्या छायेतून वाचू शकलेला नाही. जिल्हा प्रशासन या संकटाचा सामना करीत असला तरी अनेक मर्यादा पडत आहेत. साडेसातशे रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सीएफटीआय ट्रस्टच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला व्हेंटीलिटर मशीन भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सीफटीआय ट्रस्टच्या माध्यमातून बेसीक इमनजेन्सी व्हेंटीलीटर मशिन आज देण्यात आले. सदर व्हेंटीलिटर मशीन पोर्टेबल असल्याने रुग्णालयाबरोबरच रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असलेल्या रुग्णाला देखील उपयोगी पडणार आहेत. या मशिनना आठ तासांचे बॅटरी बॅकअप असल्याने त्याचा मोठा फायदा रुग्णाला होणार आहे.
सदर व्हेंटीलिटर मशिन सुपूर्द करताना चित्रलेखा पाटील यांनी सीएफटीआय ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. कोरोनासारख्या आजाराशी लढताना जिल्ह्याचा वाढता मृत्यूदर कमी होण्यासाठी हे व्हेंटिलिटर मशिन उपयुक्त ठरावेत अशी आशा व्यक्त केली. तर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांनी सीएफटीआय ट्रस्टला धन्यवाद देत या व्हेंटीलिटरमुळे मोठी मदत मिळणार असल्याचे सांगितले. औपचारीक कार्यक्रमानंतर सीएफटीआय ट्रस्टचे अमित देशपांडे, रुपेश पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद गवई यांच्याकडे हे मशिन सुपूर्द केले.
चित्रलेखा पाटील यांनी सीएफटीआय ट्रस्टच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात लाकडाऊनमुळे गोरगरीब गरजूंना सीएफटीआय ट्रस्टच्या माध्यमातून चार हजार कुटुंबांना जीवनावश्यक अन्न धान्य आणि दैनंदिन भोजनासाठी लागणारं सगळं साहित्य पुरवण्यात आले. गावोगावी, वाड्या – वस्त्यांवर जाऊन सीएफटीआय ट्रस्टने भूकेनं व्याकूळ झालेल्यांना मदत पोचवली. कोरोनाचा विषाणू ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यापूर्वी सीएफटीआय ट्रस्टचे जंतूनाशक फवारणी पंप प्रतिकारासाठी पोहचले. दोनशे गावांना जंतूनाशक फवारणी पंपांसह अडीच हजार लिटर जंतूनाशक औषधाचे वितरणही सीएफटीआय ट्रस्टने केले. यातून अप्रत्यक्षरित्या तब्बल सव्वासहा लाख ग्रामस्थांना लाभ झाला. त्यानंतर अशा प्रकारचे व्हेंटिलिटर मशिन देऊन आरोग्य व्यवस्थेला हातभार लावल्याचे दिसत आहे.