कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील कोलाड खांब देवकान्हे विभागातील नावलौकीक असलेली गोवे ग्राम पंचायत निवडणुकीत नऊ पैकी नऊ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या त्यामुळे नऊ पैकी नऊ जागा या राष्ट्रवादीने कायम राखत विरोधकांना धूळ चारीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला तद्नंतर सरपंच पदाची सोडतीत ही सर्वसाधारण पुरुष असल्याने गोवे मुठवली शिरवली ग्रामस्थ महिला वर्ग तसेच युवक युवती यांच्या सर्वांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने सरपंच पदाच्या खुर्चीवर कोलाड खांब देवकान्हे विभागातील युवकांचे मार्गदर्शक आधारस्तंभ तथा युवा कार्यसम्राट उच्चशिक्षित शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोविड काळात गरजू आणि गरीब कुटूंबना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू घरपोच देत त्यांचे कुटूंब सावरणारा खरा युवा कार्यकर्ता महेंद्रशेठ (दादा) नामदेव पोटफोडे यांची गोवे ग्राम पंचायत सरपंच पदावर बिनविरोध नियुक्ती करण्यात आल्याने चिल्हे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा.
यावेळी गाव कमिटीचे अध्यक्ष सुधीर लोखंडे ,न.शि.प्र. मं. खांब चे संचालक तथा श्रमिक विद्यालय चिल्हे चे शाळा व्यवस्थाक अध्यक्ष तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत माजी सरपंच धनाजी लोखंडे,मंगेश लोखंडे ,संदीप महाडिक,पत्रकार डॉ श्याम लोखंडे,सौ पूजा लोखंडे इत्यादींनी गोवे ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित विराजमान झालेले सरपंच महेंद्रशेठ पोटफोडे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा व सदिच्छा त्यांच्या खांब येथील निवस्थांनी भेटीत दिल्या .
कोकणचे भाग्यविधाते तथा कोकण विकासाचे शिलेदार रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कृपाआशीर्वादाने पालकमंत्री आदिती तटकरे आ. अनिकेत तटकरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षण महर्षी तथा मा.रा.जि.प.चे उपाध्यक्ष रा. ग.पोटफोडे (मास्तर) यांच्या प्रेरणेतून उपसरपंच नितीन जाधव,सदस्य नरेंद्र पवार ,सौ सुप्रिया जाधव, रंजिता जाधव ,अंजली पिंपळकर, भावना कापसे, निशा जवके,सुमित गायकवाड,यांना सोबत घेत गोवे ग्राम पंचायतीचा काय पालट होईल तसेच विकासासाठी सौदेव कटिबद्ध असलेले युवा कर्तृत्वान महेंद्रशेठ पोटफोडे हे या ग्रामपंचत सरपंच पदावर विराजमान झाले असल्याने गोवे , मुठवली, शिरवलीसह आ. वाड्यावरील विकासकामे जलदगतीने केले जातील असे सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव करत बोलत आहेत.