चिल्हे येथील आयोजित क्रिकेट सामन्यात धाक्सुद चिल्हे संघ अंतिम विजेता

shyam8

कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील धाक्सुद चिल्हे आयोजित  क्रिकेट सामन्यात  धाक्सुद चिल्हे संघ ठरला अंतिम विजेता ठरला आहे अंतिम सामना चिल्हे  व  खांब यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर धाक्सुद चिल्हे संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर खांब  संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक वैजनाथ हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर खांब संघाचा निलेश टवले स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज पंकज तर उत्कृष्ट  फलंदाज म्हणून धाक्सुद चिल्हे संघाचा सुनील खांडेकर यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले .

खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने धाक्सुद चिल्हेने आयोजित केलेल्या स्पर्धा चल्हे च्या प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे व आर डी बँकेचे संचालक मारुती खांडेकर,ग्राम पंचायत च्या उपसरपंच सौ मानसी लोखंडे,मंगेश लोखंडे ,डॉ श्याम लोखंडे ,परशुराम कोंडे ,नथुराम कोंडे , यांच्या शुभहस्ते करण्यात आले ,

तसेच कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी धाक्सुद चिल्हे चे पदाधिकारी युवक व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.