चीन : दक्षिण चायना सागरात तायवानच्या भागावर ताबा मिळविण्यासाठी युद्धाभ्यासाच्या नावावर कित्येक सैनिक तैनात केले आहेत. चीनला प्रती उत्तर देण्यासाठी तैयवानने २०० जवाननांची तुकडी प्रतास बेटावर पाठवली आहे. चीनचे सैन्य डोंगसा बेटावर हल्ल्याची योजना बनवत असल्याचे सांगितले जात आहे.
चीनच्या या युद्धाभ्यासात मोठ्या प्रमाणात मरीन कमांडो, लँडिंग शिप्स होव्हरक्राफ्ट आणि सैन्य हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. तैवानच्या नियंत्रणात असलेल्या बेटावर ताबा मिळविण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल. .
डोंगसा बेट तैवानच्या दक्षिणी शहर काउशुंगपासून जवळपास ४४५ किमी आणि चीनच्या मुख्य भूमीपासून ३०० किमी अंतरावर आहे. तेथे जास्त लोक राहत नाहीत . प्रतास बेटाला दोन समुद्रकिनारे , दोन कोरल रीफ आहेत. या भागावर वर्चस्वासाठी दोन्ही देशांनी येथे सैन्य तैनात केले आहे. या स्थितीमध्ये चीन-तैवानमध्ये युद्धजन्यस्थिती निर्माण झाली आहे.