चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी जेरबंद – गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहा.पो.निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांची दमदार कामगिरी

goregav-police
कोलाड (श्याम लोखंडे) : शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क असते. खलनिग्रणाय या शब्दाला अनुसरून गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत एका चोरीच्या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहा.पो.निरीक्षक श्रीकृष्ण नावले व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.१७/२०२१ भादवि कलम ४५४ ,४५७ ,३८० सदरचा गुन्हा हा ३१/१/२०२१ रोजी १२.३० ते ४/३/२०२१ रोजी ७ ०० वा. दरम्यान मौजे दहिवली कोंड येथे फिर्यादीचे राहते घरात घडला असून सदरचा गुन्हा दि.६/०३/२०२१ रोजी ००.४० वा.दाखल करण्यात आला होता.
सदरच्या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गोरेगाव पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे करून त्यामधील आरोपीत १) मकसुद मोहम्मद मुकादम वय -४० वर्षे ,रा.जसनाईक मोहल्ला , भोस्ते , ता.खेड ,जि.रत्नागिरी .२)अलेक्सझेंडर मरियाराज देवेंद्र वय-४६वर्षे रा.नायगाव ,ईस्ट .ता.वस ई ,मुळ रा.ता.उच्चपल्ली ,जि.रामनाड, तामिळनाडू ३) रहेमतुल्ला इब्राहिम डावरे वय वर्षे-५५ रा. दहिवली , ता.माणगाव असे निष्पन्न झाल्याने त्या तिघानाही अटक करण्यात आले आहे.
त्यांच्या कडून गुन्हयातील चोरीस गेलेले एकूण २७३ ग्रॉम वजनाचे सोन्याचे ९,७३,०००/- रू किमतीचे हस्तगत करण्यात आलेले दागिने १२डिसेंबर २०२२ रोजी मा.उपविभाग पो.आधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते सहा.पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण संभाजी नावले गोरेगाव पोलीस ठाणे यांनी इनायतउल्ला बंदरकर रा.दहिवली कोंड ,ता.माणगाव यांच्या ताब्यात दिले आहेत.

गोरेगाव पोलीस ठाण्याच्या कर्तव्य दक्ष सहा.पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले व इतर पोलीस सहकाऱ्याच्या कामगिरी चे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *