चौकच्या निबंध स्पर्धेत दिप्ती सकपाळ व एस.एस. पाटील प्रथम

mangesh

चौक : चौक येथील नेताजी पालकर मंडळ तर्फे ३६० व्या उंबरखिंड दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या खालापूर तालुका व (विद्यार्थी) व रायगड जिल्हा पातळीवरील खुल्या निबंध स्पर्धेत दिप्ती सकपाळ व एस.एस. पाटील यांनी प्रथम पटकावला

mangesh1

दरवर्षी या मंडळामार्फत अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, या वर्षी कोरोना मुळे ऑन लाईन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये यशस्वी झालेले स्पर्धक (१) विदयार्थी गट क्र. १: दिप्ती अशोक सकपाळ (छत्रपती विदयालय वावोशी), क्र. २: ऋतुजा संजय ठोंबरे (सरनोबत नेताजी पालकर विदया मंदीर चौक), क्र. ३: सोनाली राजु भंडारी (छत्रपती विदयालय वावोशी), क्र. ४: मनस्वी सचिन भुईकोट (रिलायन्स फाउंडेशन स्कुल, लोधिवली), क्र. ५: सुहानी लाला गायकवाड (छत्रपती विदयालय वावोशी), खुला गट जिल्हा पातळी क्र. १: श्री शरद शंकर पाटील (जोहे-पेण), क्र. २: विभागुन योगेश अशोक सोसे (कुंभिवली– खालापुर), श्री. लव्हेंद्र धर्मा मोकल(कळवे-पेण), क्र. ३: श्री अंकुश नथुराम जाधव (निवी-रोहा), क्र. ४: डॉ सौ. अपर्णा श्रीनिवास वाळिंबे (चौक-खालापूर), क्र. ५: श्री काशिनाथ लक्ष्मण जाधव (कराडे-पनवेल), सदर स्पर्धेचे परिक्षण श्री. अशोक मोरे (एम् ए) इतिहास अभ्यासक यांनी केले. स्पर्धेची सर्व बक्षिसे चौकचे दिवंगत ज्येष्ठ पत्रकार जनार्दन भरतुक यांच्या स्मृति निमित्ताने देण्यात येणार आहे असे मंडळाचे संघटक रायगड भुषण यशवंत सकपाळ, स्पर्धा प्रमुख भुषण पिंगळे यांनी पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.