छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचा इतिहास जपणार्‍या शिवले कुटुंबातील वंशजांचा सत्कार !

तुळापूर, पुणे येथील छत्रपती संभाजीराजांचे साखळदंड प्रथमच दर्शनासाठी बाहेर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी (फोंडा, गोवा), १९ मे (वार्ता.) : छत्रपती संभाजीराजांना अंतिमसमयी दिल्या गेलेल्या वेदनांचे साक्षीदार असलेल्या साखळदंडांच्या दर्शनाने धर्मासाठीच्या त्यागाचे स्मरण धर्मप्रेमींना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने झाले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना बंदिस्त केलेल्या साखळदंडांचे वर्षानुवर्षे जतन करून त्यांच्या बलीदानाचा इतिहास जपणार्‍या शिवले कुटुंबातील वंशजांचा महोत्सवात सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी शिवले कुटुंबातील वंशज सर्वश्री सागर शिवले, कुमार शिवले, सोमनाथ शिवले, दीपक टाकळकर, वेदांत शिवले यांचा सत्कार केला.
‘शिवले’ आडनावामागील अर्थ !
क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस अतोनात छळ करून त्यांची हत्या करून त्यांच्या देहाचे तुकडे केले. हे तुकडे शिवले कुटुंबाच्या पूर्वजांनी एकत्र करून शिवले; म्हणून त्यांचे आडनाव ‘शिवले’ असे पडले.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्या साखळदंडांनी बांधले होते, तेच साखळदंड शिवले कुटुंबाने आतापर्यंत जतन केले आहेत. आतापर्यंत कुठेही प्रदर्शनात न ठेवलेले हे साखळदंड सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्रथमच प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ‘आपल्या राजांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांनी धर्मासाठी केलेले बलीदान यांतून सर्वांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे’, असे शिवले कुटुंबातील श्री. कुमार शिवले यांनी सांगितले.

news edited by ajay soanwane, editor / journalist

***

Chanting the history of Chhatrapati Sambhaji Maharaj’s sacrifice and honoring the descendants of Shivle family!

Chhatrapati Sambhajiraj’s Sakhaldand of Tulapur, Pune is out for the first darshan!

Sachchidanand Parabrahma Dr. Athawale Nagari (Fonda, Goa), May 19 (Talk): The lovers of religion, who were witness to the last-minute pain given to Chhatrapati Sambhajiraj, came to commemorate the sacrifice of the devotee of Dharma, on the occasion of ‘Sanatan Rashtra Shankhanad Mahotsav’.

Dharamveer Chhatrapati Sambhaji Maharaj had banned Sakhaldanda by reciting the history of his sacrifice year after year and honoring the descendants of Shivle family during the festival. Sadguru Nilesh Singbal, a preacher of Hindu Janajagruti Samiti, felicitated the descendants of Shivle family, Shri Sagar Shivle, Kumar Shivle, Somnath Shivle, Deepak Takalkar, Vedant Shivle.

Meaning of ‘Shivale’ Adanavamagila!
Cruel Karma Aurangzeb, Chhatrapati Sambhaji Maharaj, tortured him for 40 days, murdered him and cut his body into pieces. Hey Shivale, collect the pieces of your family ancestors, Shivale; That’s why his name was ‘Shivale’.

The bonds that Aurangzeb had with Chhatrapati Sambhaji Maharaj are the same bonds that Shivle’s family has maintained till now. Sakhaldand, which has not been organized anywhere till now, would have been organized for the first time during Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav. ‘The glorious history of Apalya Raja and the sacrifices he made for the cause of religion inspire everyone to do religious work, hence this exhibition is being organized’, said Mr. Shivale of the family. Kumar Shivale said.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *