छम छमच्या दरबारात बारबालांमध्ये तुफान राडा

baar
पनवेल (संजय कदम) : ग्राहकाने पैसे उडविण्यावरून तालुक्यातील मुन लाइट या बारमध्ये बारबालांमध्ये जुंपली. ही मारहाण एवढी भयानक झाली की प्रकरण पोलिसांत गेले. अखेर पोलिसांनीही या घडलेल्या प्रकाराबाबत थेट गुन्हा नोंदविला.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुनलाइट या लेडीज सर्व्हिस बारमध्ये एक गिहाईक पैशांची उधळण करत होता. मात्र काही वेळाने त्याने पैसे वाटण्याचे अचानक थांबवले.
मनीषा शेट्टी (नाव बदललेले आहे) ही त्यावेळी गायनाच्या मजल्यावरून मुनलाइट हॉटेलमध्ये गात होती. मनीषा हिचे गायन संपले आणि ती मेकअप खोलीत आरामासाठी गेली.
यावेळी गिऱ्हाईक पैसे देण्यास तयार असताना मनीषाने ग्राहकाला पैसे न देण्याचा सल्ला दिल्याच्या कारणावरून खोलीत असणाऱ्या रुक्साना, सोनम आणि आरोही या तीनही महिला वेटरने मिळून मनीषाला बेदम मारहाण केली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *