जन्माष्टमी आज, उद्या दोन दिवस साजरी होणार, पहिल्यांदा बुधाष्टमी आणि सर्वार्थ सिद्धी योग  

पेण : आज देशाच्या अनेक भागात जन्माष्टमीचा सण साजरा केला जात आहे. हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. जगन्नाथ पुरी, बनारस आणि उज्जैनमध्ये कृष्ण जन्माष्टमी आज साजरी केली जात आहे. तर, मथुरा आणि द्वारकामध्ये जन्माष्टमी उद्या 12 तारखेला साजरी केली जाईल. मात्र, कोरोनामुळे मंदिरात लोकांना प्रवेश नसेल. मथुरात यावेळी मंदिरात भाविकांना प्रवेश मिळणार नाही. केवळ टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहता येईल.

जन्माष्टमीचा सण या वर्षी मंगळवार 11 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. मात्र, यावेळी अष्टमी तिथी 11-12 ऑगस्ट अशी दोन दिवस राहील. यामुळे अनेक ठिकाणी बुधवार 12 ऑगस्टला सुद्धा लोक जन्माष्टमी साजरी करतील. जन्माष्टमीचा सण यावर्षी खास आहे, कारण 27 वर्षानंतर एक अतिशय अद्भूत संयोग बनत आहे. 1993 नंतर जन्माष्टमीला पहिल्यांदा बुधाष्टमी आणि सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे. ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुळ, मकर आणि मीन राशींना यामुळे जास्त लाभ होऊ शकतो.