सर्वांना पावसाळ्यातआवडणारा पदार्थ म्हणजे, भजी. या वातावरणामध्ये भजी खाण्याची आनंद काही वेगळीच असतो . त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही नवीन भजी प्रयत्न करू शकता.
सध्या पावसाळा असल्यामुळे ताजे मके तुम्हाला सहज उपलब्ध होतील. वर्षभर मके उपलब्ध असतात पण पावसाळ्याच्या वातावरणात मके खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मक्याचा कणीस उकडून किंवा भाजून खाण्यापेक्षा तुम्ही कधीतरी भजी ट्राय केलीत तर घरची मंडळी तुफान खूश होतील. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची मक्याची कुरकुरीत भजी.
साहित्य :
मक्याचे चार वाटी उकलेल्या दाण्याची पेस्ट
1 बटाटा उकडलेला
ब्रेडक्रम्स
थोडं तांदळाचे पीठ
हिरव्या मिरच्या
हळद
जिरं, ओवा
मीठ
तेल
पाणी
कृती :
– मक्याच्या दाण्याची पेस्ट घेऊन त्यात कुस्करलेला बटाटा एकत्र करून घ्या.
– त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पिठ, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, जिरं, ओवा एकत्र करून घ्यावं.
– मिश्रण व्यवस्थित एकजीव करावं.
– तयार मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करावे.
– हे गोळे ब्रेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात तळावेत.
– गरमा गरम मक्याची भजी खाण्यासाठी तयार आहेत.