अलिबाग : शिक्षा मंत्रालय भारत सरकारव्दारा संचलित जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, ता. माणगाव या विद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
इयत्ता 6 वी साठी पात्रता-
विद्यार्थी रायगड जिल्ह्याचा प्रमाणित रहिवासी असावा, सन 2022-23 मध्ये रायगड जिल्ह्यातील शासकीय/शासनमान्य शाळेत इयत्ता 5 वी मध्ये संपूर्ण शैक्षणिक वर्ष शिकत असलेला विद्यार्थी असावा, जन्म तारीख दि.01 मे 2011 ते दि.30 एप्रिल 2013 मधील असावी, इयत्ता 3 री, 4 थी वर्ग शासकीय शासनमान्य शाळेतून सलग उत्तीर्ण असावा.
आवश्यक कागदपत्रे-
नवोदय विद्यालयाच्या संकेत स्थळावर दिलेले प्रमाणपत्र ( STUDY CERTIFICATE) विद्यार्थी ज्या शाळेत 5 व्या इयत्तेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या सही शिक्क्यासहित संपूर्ण भरून ते प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे, विद्यार्थी व पालकांची सही स्कॅन करून अपलोड करावी, विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून अपलोड करावा.
विद्यालयाची वैशिष्टये-
इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी पर्यंत सीबीएसी पाठ्यक्रमाप्रमाणे शिक्षण, मुली व आर्थिकदृष्टया दुर्बल (BPL) मुलांसाठी इयत्ता 12 वी पर्यंत संपूर्ण मोफत शिक्षण तसे सरकारी नोकर व सक्षम यांच्या मुलांसाठी इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी पर्यंत न्यूनतम विद्यालय विकासनिधी, इयता 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत अभ्यासाचं साहित्य, शाळेचा गणवेश, पादत्राणे, साबण, तेल, अंथरूण पांघरूण, गादी, बेडशीट, मच्छरदाणी, इ., इयत्ता 12 वी पर्यंत मुला-मुलींचे सहशैक्षणिक निवासी विद्यालय, पुस्तकी ज्ञानाबरोबर खेळ, संगीत, कला, योगविद्या आदी क्षेत्रात विद्यार्थ्यांना पारंगत करून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासाबरोबर तसेच विद्यार्थ्यांना बाहेरील स्पर्धेसाठी तयार करते, विद्यार्थी स्वावलंबी आणि स्वयंप्रेरित बनतात, सीबीएससी पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार करतो, मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुसज्ज वसतिगृह व भोजनालय, सुसज्ज कॉम्प्युटर व विज्ञान प्रयोगशाळा, सॅमसंग स्मार्ट क्लास रूम, ग्रंथालय, क्रिडांगण व जिम उपलब्ध.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 असून परीक्षा शनिवार, दि.29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. ऑनलाईन अर्जाकरिता www.navodaya.gov.in किंवा http://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळावर भेट द्यावी व अधिक माहितीसाठी श्री. संतोष आर. चिंचकर, मो.9881351601, श्री. सतीश जमदाडे, मो.9890343452, श्री.केदार केंद्रेकर, मो.9423113276/7038215346 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्री.किरण इंगळे यांनी केले आहे.