पाकिस्तान (कराची ) : पाकिस्तानला मोठा झटका जागतिक बँकेने दिला असून, पाणी वाटपावरून मध्यस्थी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जागतिक बँकेने दोन्ही देशांना तटस्थ विशेष तज्ञ किंवा न्यायालय यांची नेमणूक करावी असे स्पष्टमत बँकेने मांडले आहे.
जागतिक बँकेचे पाकिस्तान प्रकरणांचे माजी संचालक पेटचमुथू इंलगोव्हन म्हणाले की, या वाद मिटविण्यासाठी भारत-पाकिस्तानने मिळून काम केले पाहिजे. पाकिस्तानने जागतिक बँकेला भारतातील दोन जलविद्युत प्रकल्पांबाबत आर्बिट्रेशन कोर्ट (सीओए) नेमण्याची विनंती केली होती.
भारताच्या ३०३० मेगावॅट क्षमतेच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्प आणि ८५० मेगावॅटच्या रातले जलविद्युत प्रकल्पावर पाकिस्तानचा आक्षेप आहे. तर भारतनुसार, आम्ही जागतिक बँकेच्या नियमांनुसार जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी हे प्रकल्प चालवित आहोत.
दरम्यान, १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन्ही देशांत पाण्यावरून वाद सुरू आहे. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज नद्यांचा समावेश असलेल्या सिंधू जल प्रणाली भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये वाहते. या नद्यांवर भारताने धरणे बांधून पाण्याचा वापर करत आहे आणि यामुळे त्यांच्या भागात पाणीटंचाईमुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाले असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.