Dr. Sameer B Pandit
M.D. (A.M.)
कढीपत्ता ही सहज कुठेही उपलब्ध होणारी वनस्पती आहे. गावाकडे २/३ घरे सोडुन एक तरी कढीपत्त्याचे झाड आपल्याला मिळेलच. भाजीमध्ये सर्रास वापरला जाणारा हा घटक आहे. भाजीमध्ये याचा उपयोग फक्त सुगंधी वास यावा यासाठी केला जातो. कढीपत्ता हा फक्त सुगंधी नसुन त्याचे बरेचसे औषधी उपयोग आहे.
कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच, पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होती. कढीपत्त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास सौंदर्यात भर पडते. कढीपत्त्याच्या वापराने मुरुमं तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही पाने वाटून त्यांची पेस्ट बनवा. कोरड्या त्वचेसाठी ही पेस्ट चांगली आहे. यामुळे चेहऱ्याला चमकही येते. या पेस्टने बॉडीला मसाज केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात, तसेच जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर, कढीपत्त्याच्या पानांची पावडर करुन नियमित ३ ते ४ ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी त्याचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो. कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार दही घाला. तयार मिश्रण केसांना लावल्यानंतर तुम्हाला एकदम थंड वाटेल. हे मिश्रण २० ते ३० मिनिटे ठेवून केस स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हे मिश्रण केसांना लावा. कढीपत्त्याच्या पानांचे तेल बनवुन ते रोज केसांना लावल्यास केस सुंदर व मुलायम होतात. केस गळती थांबवण्यासाठी रोज कढीपत्त्याचे १ पान चावुन खावे.
केसांसाठी आरोग्यदायी कढीपत्ता :- कढीपत्त्यातील प्रोटीन्स तुमचे केस लांब होण्यासाठी आणि गतीने वाढण्यासाठी फायदेशिर ठरू शकतात.
कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी असते. व्हिटॅमीन बी हे केसगळती थांबविण्यासाठी फायदेशीर ठरते. केसांना नैसर्गिक आणि चमकदार रंग प्राप्त करण्यासाठीही कढीपत्ता फायदेशीर ठरतो.
दह्याची कढी, विविध प्रकारची चटणी, तसेच इतर भारतीय पदार्थांमध्ये आवर्जून वापरण्यात येणार्या कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म चकीत करणारेच आहेत. कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी १, बी ३, बी ९ आणि सी असतात. याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळते. गरजेपेक्षा जास्त केमिकलचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होते. कढीपत्त्यात अशी सर्व पोषकतत्त्वे आहेत, जे केसांना निरोगी ठेवतात. त्याबाबत जाणून घेऊयात…
१) कढीपत्त्याचा चहा :- कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. त्याचबरोबर केस पांढरे होण्याची समस्याही दूर होईल.
२) केसांसाठी मास्क :- कढीपत्त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडे दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिटे तसेच ठेवा, नंतर शॅम्पूने केस धुवा. असे नेहमी केल्याने केस काळे आणि घनदाट होतात.
३) कढीपत्त्याचे तेल :- कढीपत्ता वाळवून घ्यावा. वाळल्यानंतर पानांची पावडर तयार करून घ्यावी. आता २०० मिमी खोबरेल तेलात जवळपास ४ ते ५ चमचे कढीपत्त्याची पावडर मिक्स करून उकळून घ्यावी.
चांगल्या उकळीनंतर ते थंड होऊ द्यावे. मग तेल गाळून एका हवाबंद बॉटलमध्ये टाकावे. झोपण्यापूर्वी दररोज हे तेल लावावे. जर तेल थोडे कोमट करून लावले तर अधिक फायदेशीर ठरते. दुसर्या दिवशी केस धुवावेत.
(हे केवळ आपल्या माहिती साठी आहे, परंतु हे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)