पेण : पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण आला १० वर्षे उलटून सुद्धा सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेर ७ सप्टेंबर रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. या बँकेत सुमारे २ लाख ठेवीदारांचे सुमारे ७५० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. सदर रकमेमध्ये घोटाळा झाला होता.
यासंदर्भात पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली पेण येथे ठेवीदार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा बरोबर शनिवारी ५ सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता बैठक घेण्यात येईल व सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानेे ७ सप्टेंबर रोजी होणारे पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती समितीचेे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली आहे.