जिल्हा प्रशासन आयोजित कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात पांडवादेवी-रायवाडी तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल अंतिम विजेते

raigad-collector

अलिबाग : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली  बुधवार, (दि.14 डिसेंबर 2022) रोजी पी.एन.पी. महाविद्यालय, वेश्वी, अलिबाग येथील क्रीडांगणावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने रायगड जिल्हा प्रशासनाकडून आयोजित कबड्डी चषक स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली. सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी(सा.प्र.) सर्जेराव म्हस्के पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी, तहसिलदार विशाल दौंडकर, डॉ.सतिश कदम, केदार शिंदे, जगन्नाथ वरसोलकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पीएनपी महाविद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी  आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-

महिला गट-प्रथम – कर्नाळा स्पोर्ट्स पनवेलद्वितीय –  भिल्लेश्र्वर क्रीडा मंडळ, किहीम, तालुका अलिबागतृतीय – टाकदेवी क्रीडा मंडळ, मांडवा, तृतीय – दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल

पुरुष गट-प्रथम – पांडवादेवी रायवाडी , तालुका अलिबागद्वितीय – ज्ञानेश्वर कोळवे, तालुका पेण, तृतीय – बजरंग , रोहा, तृतीय – मरीदेवी, धेरंड.

बक्षीस वितरण प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले. खेळाडूंनीही या स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त संघांना (दोन्ही गट पुरुष आणि महिला )आकर्षक चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक (प्रथम-31 हजार,  द्वितीय-21 हजार, आणि तृतीय (2 संघांना) -11 हजार)  देण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन चे तांत्रिक अधिकारी आणि स्पर्धा प्रमुख श्री.जनार्दन पाटील, श्री.जे.जे.पाटील, पी.एन.पी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.म्हात्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी सचिन निकम, सिद्धार्थ खंडागळे, प्रफुल, सुरेंद्र, अमित, पी.एन.पी महाविद्यालयाचे खेळाडू स्वयंसेवक, खेळाडूंना वैद्यकीय सुविधा देणारे अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.आशिष मिश्रा, डॉ.अजित बरगे व त्यांचे सहकारी आदी सर्वांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *