जिल्ह्यात ‘या’ तारखेला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

court
अलिबाग : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्री.अमोल अ.शिंदे यांनी कळविले आहे.
 या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरण, मोटार आपघात प्रकरणे, 138 एन.आय ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र पालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीज वितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
 राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोठया संख्येने प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोकअदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती एस.एस.सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *