कर्जत (गणेश पवार) : झारखंड राज्यात जैन धर्माचे २० तीर्थकर हे ज्या भूमित मोक्षास गेले व ती झारखंड राज्यातील भूमी ही जैन धार्माचे प्रवित्र स्थळ व एक जिवंत शाश्वत तीर्थ स्थळ तसेच भारतातील तमाम जैन धर्मियांच्या श्रद्धेचे स्थान असल्याने, या जैन धर्मियांचे प्रवित्र व श्रद्धेचे स्थळास झारखंड राज्य सरकार कडून सम्मेद शिखरजी पर्यटक स्थळ म्हणून घोषित केल्यामुळे व या ठिकाणी मोठया प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे या प्रवित्र असलेल्या भूमितील पावित्र्य हे नष्ठ होईल.
तर झारखंड राज्य सरकार कडून घोषित करण्यात आलेले पर्यटक स्थळ रद्द करून सदर प्रवित्र स्थानास सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे प्रवित्र स्थळ म्हणून घोषित करावे. या संदर्भात झारखंड राज्य सरकारच्या निषेधाप्रती कर्जत तालुक्याती नेरळ मधिल भारतीय जैन संघटना संचालीत श्री मुनीसुव्रत स्वा श्वे. मू.जैन संघटना नेरळ यांच्या माध्यमातून निषेध रॅली काढून निषेध व्यक्त करून कर्जत तहसिलदार, नेरळ पोलीस ठाणे, तसेच स्थानिक खासदार अप्पासाहेब बारणे व स्थानिक आमदार महेंद्र थोरवे याचे भाचा संकेत भासे यांना निवेदन देण्यात आले.
या निषेध रॅलीमध्ये जैन संकल संघ नेरळ, जय जिनेद्र ग्रुप नेरळ, अंहीसा मंडळ व अहंम मंडळ तसेच अनिल जैन, संकलेश जैन, ललित जैन, विनोद हिंगड, विनोद जैन, राहुल जैन,धिरज जैन, भरत जैन, संजय जैन, तरंग जैन, मेहुल जैन, ओजस जैन, अमित जैन, दीलीप जैन आदी जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते