कर्जत (गणेश पवार) : सध्या राज्यात झालेले सत्तांतर व ठाकरे गटातून शिंदे गटात होत असलेल्या पक्ष प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू असताना, कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. ४ मधून शिवसेनेच्या सदस्या म्हणून निवडूण आल्या होत्या.
तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नेरळ ग्राम पंचायतीच्या सरपंच सह काही विदयमान सदस्य यांनी शिंदे गटात गेलेले कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विश्वास ठेवून त्यावेळी शिंदे गटात प्रवेश केला होता. तर पाच सदस्य सदस्य हे ठाकरे गटाच्या शिवसेनेत होते.
त्या पैकी विद्यमान सदस्या सौ जयश्री मानकामे व त्यांचे पती मनोज मानकामे यांनी दि. ५ जानेवारी २०२३ रोजी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या पोसरी येथील शिवतीर्थ या निवासस्थानी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट तथा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
या पक्ष प्रवेशास नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी ग्रामपंचायत सदस्य गिताजंली देशमुख, शिवानी पोतदार, उमा खडे, माजी सरपंच जान्हवी साळुंके, कर्जत तालुका उपाध्यक्ष अंकुश शेळके, मिलिंद विरले, जयवंत साळुंके, केतन पोतदार, अंकुश दाबणे, किसन शिंदे, सचिन खडे, किशोर घारे, सुनील निरगुडा, गजूभाई वाघेश्वर ,कविता शिंगवा, यांच्या आदी पदाधिकारी उपस्थित होते.