‘वंचित’चे पनवेलमध्ये ‘डफली बजाओ’, सरकारच्या ‘या’ धोरणाचा केला निषेध

पनवेल : वंचित बहुजन आघाडी तर्फे डफली बजाओ आंदोलन बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळ पनवेल बस डेपो मध्ये “डफली बजाओ” आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये केंद्र सरकार व राज्यसरकार यांच्या देशातील लोकडाऊनच्या धोरणा विरोधात घोषणाबाजी करून सर्वसामान्य जनतेनी नाराजी व्यक्त केली.

जर देशातील लोकडाऊन शासनाने मागे घेतले नाही आणि सर्वसामान्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती स्थिर करण्यासाठी जर बस सेवा सुरू केली नाही, आणि सर्वसामान्य गरीब जनतेची अशीच पिळवणूक होत राहिली तर सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला.

आंदोलनासाठी पनवेल तालुका वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष दीपक कांबळे, पनवेल तालुका सरचिटणीस नितीन गायकवाड, पनवेल तालुका विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत जाधव, भारतीय बौद्ध महासभा राज्य उपाध्यक्ष सुशील वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस विजय गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका अध्यक्ष राम जाधव, तसेच वंचित बहुजन आघाडीचे पनवेल कार्यकर्ते गणेश जाधव, विजय जाधव, संतोष कांबळे, स्वप्निल पवार, मंगेश जाधव,तसेच अनेक छोट्या-मोठया संघटनांच्या पाठिंब्याने व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला