माथेरान (मुकुंद रांजाणे) : ऐन थंडीच्या दिवसांत गोरगरीब गरजवंतांना मायेची ऊब देण्यासाठी बदलापूर येथील ममता हॉस्पिटल स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रकाश राठोड यांच्या पुढाकाराने माथेरान मधील राकेश कोकळे मित्र परिवाराच्या प्रयत्नाने शास्त्री हॉल येथे सायंकाळी पाच वाजता कष्टकरी विधवा महिला तसेच अन्य गरजवंतांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
डॉ प्रकाश राठोड हे नेहमीच माथेरान मधील गरजवंतांना सढळ हाताने मदतीसाठी पुढाकार घेत असतात. राकेश कोकळे यांचे जुने हितसंबंध असल्याने कोकळे यांनी इथल्या गरजवंतांसाठी काही सहकार्याची मागणी केल्यास डॉ. राठोड नेहमीच सहकार्याची भूमिका पार पाडत आहेत. मागील कोरोना काळात सुध्दा त्यांनी घोड्यांसाठी पशुखाद्य उपलब्ध करून दिले होते.
यावेळी एकूण सत्तर ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले त्याचा लाभ गरजवंतांनी घेतला. सर्व लाभार्थ्यांनी डॉ.प्रकाश राठोड आणि राकेश कोकळे मित्र परिवाराचे आभार मानले. या स्तुत्य उपक्रमासाठी राकेश कोकळे मित्र परिवाराचे प्रवीण बावदाने, करण जानकर, पंकज कोकरे, शुभम सपकाळ, अनिकेत कोकरे, तुषार बिरामने, मारुती कोकळे, संतोष ढेबे, आतिश ढेबे, दीपक रांजाणे, जहुर चिपाडे यांची मोलाची साथ लाभली.